
रेणापूर { दिपक पाटील } : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कारवाई करण्याचे सत्र सुरूच आहे. याचाच एक व्हिडीओ आमच्या चॅनल वर दोन दिवसापूर्वीच दाखवण्यात आला होता, रेणापूर पोलीसांच्या जिवावर मटका किंग गज्या करतो मज्या ,पोलीस अधीक्षक यांचे पथक वाजवणार का त्याचा बाज्या ? ही बातमी प्रसिद्ध केली होती, त्या बातमीची दखल घेऊन , पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीसांच्या पथकाने रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.३ फेब्रुवारी रोजी २ ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीररित्या मटका जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या एजंटसह बुकीवर रेणापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार २ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या पथकाने पहिली कारवाई पिंपळफाटा ता. रेणापूर येथील जयभवानी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये १) नाजम चुन्नू शेख, वय ४५ वर्षे, रा.फरदपूर ता. रेणापूर, २) मोहन सुरेश राठोड वय ३२ वर्षे,रा. केळगावतांडा ता. रेणापूर, ३)प्रवीण साहेबराव गांधले वय ४१ वर्ष, रा.बर्दापूर ता.अंबाजोगाई जि. बीड, ४) काशिनाथ किशन भिसे वय ५२ वर्ष रा. सुमठाणा ता.रेणापूर जि. लातूर हे कल्याण मिलन डे नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याचे आढळून आले त्यांच्याकडे जुगारातील जमा झालेली रोख रक्कम, जुगाराचे साहित्यसह ६१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल विशेष पथकाच्या पोलीसांनी जप्त केला आहे.आरोपीतांकडे मटका जुगाराचे आकडे कुणाकडे देता व तुमचा बुकीमालक कोण आहे असे विचारले असता गजेंद्र चव्हाण रा. रेणापूर यास आम्ही सदरचा खेळ चिठ्ठ्या व मोबाईलवरून व्हाट्सअपद्वारे मटक्याचे आकडे पाठवत असल्याचे दाखवले. याप्रकरणी ५ आरोपी विरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दुसरी कारवाई पिंपळफाटा येथील हॉटेल श्रद्धा च्या पाठीमागे सुरु असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी नामे १) विकास जगन्नाथ सिनगारे वय ३० वर्षे, रा.माळी गल्ली, बर्दापूर ता. अंबाजोगाई जि. बीड , २) शिवाजी उत्तम मकापल्ले वय २६ वर्षे,रा. कल्पनानगर रेणापूर फाटा ता. रेणापूर जि. लातूर हे कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याचे आढळून आले त्यांच्याकडे जुगारातील जमा झालेली रोख रक्कम, जुगाराचे साहित्यसह १० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल विशेष पथकाच्या पोलीसांनी जप्त केला आहे.नमूद आरोपीतांकडे मटका जुगाराचे आकडे कुणाकडे देता व तुमचा बुकीमालक कोण आहे असे विचारले असता गजेंद्र चव्हाण रा. रेणापूर यास आम्ही सदरचा खेळ पाठवतो असे सांगितले.याप्रकरणी नमुद ३ आरोपीताविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. असा एकूण ७१ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीता विरुद्ध २ स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. सदरील कार्यवाहीत पो.हे.लक्ष्मीकांत देशमुख ,पो.ना.रमेश चौधरी, पो.शी.मनोज खोसे, चापोना संतोष क्षिरसागर यांनी सहभाग घेतला.
