निलंगा (प्रतिनिधी) केंद्र शासनातर्फे घेतल्या जाणार्या सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .त्यात चंद्रपुर सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेत उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक /1557 महादेव भुतमपल्ले यांची मुलगी माहेश्वरी महादेव भुतमपल्ले हिने घवघवीत यश सपांदन करुन महाराष्ट्रात अनुसुचित जमाती या प्रवर्गातुन मुलीमध्ये तिसरी तर मराठवाड्यातुन पहिली येवुन 10 मुलीच्या जागेसाठी आपले स्थान निश्चीत केले आहे.ती सगांरेड्डीवाडी ता.निलगा या गावातुन निवड होणारी पहिली मुलगी व संपुर्ण महाराष्ट्रातुन या वर्षीची एकमेव पोलीस पाल्य असल्यामुळे तिच्या या यशाबद्यल तिचे आजोबा समिदंर भुतमपल्ले,समस्त गावकरी,मित्र परिवार,शिक्षकवर्ग व पोलीस दलाकडुन अभिनदंन करुन शुभेच्छांचा वर्षाव करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.
