
लातूर :- ( दिपक पाटील ) कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले गुटखा मालक आज लखोपती झालेत. असेच लातूर शहरातील खाडगाव रोडवरील दोन भाई, लोकांना घरी असलेल्या मशीनरीवर डुप्लिकेट जर्दा, रजनीगंधा , स्वतःच बनवायचा व तेच वेगवेगळ्या नावाने गुटखा बाजारात विकायचा व त्यांच्या खिशातील पैसे काढून आपले खिसे भरायचे हे त्यांचे कर्तृत्व. हे करताना हप्त्याच्या जोरावर सर्व यंत्रणांना गप्प बसवायचे हे त्यांचे कौशल्य. नैतिकदृष्ट्या समाजात शून्य किंमत; पण जणू काही हे फार महत्त्वाचे असल्यासारखे रोज त्यांची चर्चा चालू आहे. हप्त्यासाठी यंञनातील लोक डोक्याला डोकी लावून बसले आहेत. वास्तविक या गुटखा मालकांना जेरीस आणायचेच ठरवले तर पोलिसांना तासाभराचा अवधी पुरेसा आहे; पण गुटखा बंदबरोबरच हप्ता बंद झाला नाही तर गुटखा मालक कधीच हद्दपार होणार नाही, अशी लातूर जिल्ह्यातील स्थिती आहे.
