नांदेड – लातूररोड नवीन रेल्वे मार्गासाठी लातूरचे खासदार आग्रही
रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून केली नवीन रेल्वे गाड्यांची मागणी
लातूर-( प्रतिनिधी ): लातूर लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या अनेक मागण्यांना घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली . नांदेड- लातूररोड या १०३ किमी अंतर असलेल्या नवीन रेल्वे मार्गाचे फायनल लोकेशन सर्व्हेच्या सूचना देण्यात याव्यात यासाठी खासदार शृंगारे यांनी आग्रह धरला . याच बरोबर लातूर-तिरुपती हि नवीन रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे . रेल्वेच्या अनेक विषयांवर या भेटी दरम्यान चर्चा झाली .नांदेड -लातूररोड या नवीन रेल्वे मार्गासाठी फायनल लोकेशन सर्व्हेच्या सूचना देण्यात याव्यात या मागणी बरोबरच लातुर ते तिरुपती ही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.लातुरवरून तिरुपती जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे,त्यामुळे ही रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी खासदारांनी लावून धरली आहे. इंदौर-दौंड-जंक्शन या रेल्वे गाडीचे विस्तारिकरन करून ती लातुर पर्यंंत सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नांदेड -पनवेल या गाडीचा अतिरिक्त वेळ कमी करून ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यन्त चालवण्यात यावी ही मागणीही रेल्वे मंत्र्यां समोर ठेवण्यात आली आहे.हैद्राबाद-हडपसर या गाडीचाही अतिरिक्त वेळ कमी करून ही गाडी पनवेल पर्यन्त सुरु करावी. मराठवाडा-विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारी अमरावती-पुणे-अमरावती ही गाडी सध्या बंद आहे, ती पुन्हा सुरू करण्यात यावी. लातुर-मुंबई-लातुर ही गाडी नेहमी ओव्हरफ्लो असते, त्यासाठी या गाडीला 6 डबे नव्याने जोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन 6 डबे जोडताना प्रथम श्रेणी-टू टायर-1,थ्री टायर-2,स्लिपर-2 तर सामान्य डबा-1 जोडण्यात यावा अशी मागणी आहे.—लातुर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारण्यात यावी ज्यामुळे गाड्यांची संख्या वाढवणे सोपे जाईल,पिट लाईनमूळे लातुर स्टेशनवर अडचणी येत आहेत अशी मागणी ठेवण्यात आली आहे. लातुर-उदगीर-सिकंदराबाद-हैदराबाद ही नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणीही खासदार- सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वेच्या मागणीला घेऊन खासदार- सुधाकर शृंगारे हे आग्रही झाल्याने लवकरच लातुरहुन नवीन रेल्वे गाड्या सुरुवात होतील अशी अपेक्षा आहे. लातुरला उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची सुरुवात लवकर करण्यात यावी व या फॅक्टरी मध्ये नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे,यावर रेल्वे मंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
