Spread the love

कोटयावधी रुपयांची संपत्ती व मंत्री पदे असणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांना जे जमले नाही ते मनसेने करून दाखविले – संतोष नागरगोजे

लातुर : ( प्रतिनिधी )शिक्षण असुनही नोकरी व्यवसांयाच्या संधी उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.नेमके कुठे प्रवेश घ्यावा व कोणते शिक्षण घ्यावे याची योग्य माहिती मिळत नसल्याने आणि खोटया शैक्षणिक जाहीरातबाजीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांची फसगत होत आहे.कोटयावधी रुपयांची संपत्ती व मंत्री पदे असणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याने जे त्यांना
जे जमले नाही ते मनसेने करून दाखविले असल्याचे मत मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी मनसेच्या वतीने लातुरात आयोजीत केलेल्या मराठवाडयातील पहिल्या राज्यस्तरीय शैक्षणिक प्रदर्शन,विज्ञान प्रदर्शन आणि भव्य स्वंय रोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी केले आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील आधुनिक जागतिक तंत्रज्ञान अवगत व्हावे,शैक्षणिक क्षेत्रातील तांत्रीक आडचणी दुर व्हाव्यात आणि नौकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतुने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालक,विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार युवकांकरिता शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.तर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्ट्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता विज्ञान स्पर्धचेही आयोजन करण्यात आले आहे.तीन दिवस चालणाऱ्या मराठवाडयातील पहिल्या राज्यस्तरीय शैक्षणिक प्रदर्शन,विज्ञान प्रदर्शन आणि भव्य स्वंय रोजगार मेळाव्याचे शुक्रवार (दि.२९ )रोजी मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून दिपप्रज्वलीत करीत थाटात उदघाटन पार पडले.यावेळी पुढे बोलतांना
नागरगोजे म्हणाले कि यापुर्वी आम्ही शेतकऱ्यांकरिता तीन दिवसाचे भव्य कृषी प्रदर्शन भरविले होते त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला होता.यावेळी शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे पालक व विद्यार्थांनी विद्यार्थ्याकरिता शैक्षणिक प्रदर्शन घेण्याच्या सुचना केल्या होत्या याबाबत आम्ही राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून हे तीन दिवसाचे शैक्षणिक प्रदर्शन घेत आहोत. शिकून सुशिक्षित बेरोजगांर असलेल्या युवकांकरिता नौकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात स्वतःचे उद्दोगधंदे उभे करावेत याकरिता मार्गदर्शनाचे विविध बँका- कंपण्याचे स्टॉल ही प्रदर्शनात उभे करण्यात आलेले आहेत तर विज्ञान स्पर्धचेही प्रदर्शनाच्या माध्यमातुन आयोजन करण्यात आले आहे. मनसे ही नेहमी शेतकरी,कष्ठकरी,बेरोजगार, अपंग,निराधार,विद्यार्थ्याच्या हिता करीता लढणारी राजकिय संघटना आहे. मोठमोठया शैक्षणिक जाहीरात बाजीमुळे विद्यार्थी व पालक गोंधळलेला आहे तर लांखोंचे डोनशन घेवुन शिक्षण देणाऱ्या संस्थामुळे मेटाकुटीला आला आहे.नेमका प्रवेश कुठे व कश्याला घ्यावा हेच विद्यार्थाना समजत नसल्यामुळे तो फसव्या जाहीरातीला बळी पडत आहे. शिक्षीत होवुनही नौकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे.कोटयावधी रुपयांची संपत्ती व मंत्री पदे असणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याने जे त्यांना जे जमले नाही ते मनसेने करून दाखविले असल्याचे म्हणत त्यांनी कोणाचेही नाव न घेता पालकमंत्री,मंत्री व जिल्हयातील आमदारांना संतोष नागरगोजे यांनी टोला लगावला संतोष नागरगोजे.
यावेळी डॉ.नरसिंह भिकाणे,संजय राठोड, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शिवकूमार नागराळे,मनोज अभंगे,रवि सुर्यवंशी,प्रिती भगत,रेखाताई नागराळे,रणबीर उमाटे,आदि उपस्थित होते,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण चव्हाण यांनी सुत्रसंचलन बालाजी कांबळे तर आभार भागवत शिंदे यांनी मानले. उदघाटन कार्यक्रमाला मोठया संख्येंनी विद्यार्थी पालक, सुशिक्षित बेरोजगार युवक उपस्थित होते.


प्रदर्शनाची वैशिष्टये…..
शिक्षण विषयातील तंज्ञाचे मार्गदर्शन,
१००पेक्षा अधिक शैक्षणिक स्टॉल, शासकिय सहभाग,शिक्षण विभाग,समाजकल्याण
विभाग,शासनाच्या विद्यार्थ्यासाठीच्या योजना आणि योजनांची माहिती देणारे स्टॉल व तज्ञ कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन,मेडीकल प्रवेश मिळण्यासाठी माहिती देणारे कौन्सलिंग सेंटरचे स्टॉल,देशभरातील नामांकित इन्स्टिट्युटचे स्टॉल व मार्गदर्शन, विद्यार्थी व पालंकासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार,भव्य जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनस्पर्धा.यात
विविध नामांकित शैक्षणिक संस्थां सहभागी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!