Spread the love


लातुरः-( प्रतिनिधी) जिल्ह्यातील काही हॉस्पिटल मधील असलेल्या मेडिकल दुकानाचे अप्रत्यक्ष मालक हे डॉक्टरच आहेत का ? याची चौकशी शासनाने करुन स्वतःचाच संलग्नित मेडिकल दुकानातुन औषधी घेण्याची सक्ती रुग्णांना करणाऱ्या हॉस्पिटल्स वर कारवाई करा, या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी व प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आले.औषध गोळ्या व इतर मेडिकल साहित्य यात अधिक नफा मिळविण्यासाठी ही डॉक्टरांनी त्यांचा हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने मेडिकल दुकान सलग्णीत करुन डि. फार्मसी/ बि. फार्मसी पदवीधारकाच्या नावे परवाना काढुन फार्मासिस्टला पगारीवर ठेऊन स्वतःच अप्रत्यक्षपणे मेडिकल दुकान चालवतात आणि त्यांचा कडे उपचारासाठी भरती झालेल्या रुग्णांना त्यांचाच हॉस्पिटल मधील सलग्णीत असलेल्या औषधी दुकानातुनच औषधी, इंजेक्शन्स व उपचारासाठी लागणरे इतर सर्वच साहित्य सक्तीने खरेदी करायला लावतात व त्याचांच मेडिकल दुकानात मिळणारे महागडे व डॉक्टरांचा आर्थिक फायदा करणाऱ्या कंपनीचे औषधी डॉक्टर लिहुन देतात.रुग्णांना परवडतील असे इतर स्वस्त कंपनीचे अथवा जनेरीक औषधी लिहुन देत नाहीत. रुग्ण नातेवाईकांनी शहरातील बाहेरील मेडिकल दुकानातुन सेम कंटेंटचे स्वस्त कंपनीचे औषधे विकत आणले तर ते रुग्णाला उपचारासाठी देण्यासाठी डॉक्टर नकार देतात. व त्यांचेच मेडिकल दुकान मधुन औषधी खरेदि करणेसाठी सक्ती करतात. अशा प्रकारे रुग्णांची अडवणुक करुन औषधी दुकानातुन पण जास्तीचे दर लावुन रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशा प्रकारे काही डॉक्टर दुहेरी व्यवसाय करुन शासनाची व रुग्णांची दिशाभुल करुन आर्थिक लुट करत आहेत का? याची चौकशी करुन लातुर जिल्ह्यातील सर्वच खाजगी हॉस्पिटल्सला सलग्णीत असलेल्या औषधी दुकानांची व व्यवसायीकांची चौकशी करावी आणि तसेच औषधी दुकानात व्यवसायीकाने खरेदी, विक्री,केलेले सर्वच औषधांचे अॉडीट करणे आवश्यक आहे यामुळे हॉस्पिटल्स आणि सलग्णीत औषधी व्यवसायीकांचे असलेले लागेबाधे उघडकिस येतील व रुग्णांची आर्थिक लुट थांबले तरी याबाबत प्रशासनाने त्वरीत चौकशी करुन रुग्णांना न्याय द्यावा अन्यथा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने तिव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा निवेदनाद्वारे दिला यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रमुख ॲड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा,मराठवाडा अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा संपर्कप्रमुख शंकरराव सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते, जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे,युवती प्रमुख सुष्मिता बोरा, जिल्हा सचिव बाबासाहेब बनसोडे, जिल्हाउपाध्यक्ष श्रीकृष्ण डाळे, विशाल होके निलंगा तालुकाध्यक्ष काशिनाथ नदीवाडे , रतिकांत नंदगे, महादेव पोलदासे,स्वाती कासारे, डि.वाय होळकर, आदी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!