
मुरूम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) : समतावादी समाज माध्यमातून जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.३) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अंनिसचे जिल्हा पदाधिकारी प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. सुजित मठकरी, डॉ. सुशील मठपती, डॉ. शिला स्वामी, डॉ. संध्या डांगे, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. अविनाश मुळे, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. सोमनाथ बिरादार, प्रा. सचिन राजमाने, काकासाहेब पाटील, दत्तु गडवे, राजानंद स्वामी, श्रावण कोकणे आदिंच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
