
औसा ( प्रतिनिधी ) तालूक्यातील भादा पोलीस स्टेशन अंतर्गत कायद्याच्या बोलक्या भिंती व पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उदघाटन आज लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी उपविभागीय पो. अधिकारी श्री मधुकर पवार, भादा पोलीस स्टेशन चे सपोनि विलास नवले गावचे उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रा.प. सदस्य अमोल पाटील ,म.गांधी गाव तंटामूक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पेव्हर ब्लॉकचे काम ग्रा. प. भादा यांचे सहकार्याने झाले आहे.भादा पोलीस स्टेशनचा पदभार हातात घेतल्या पासून सपोनि विलास नवले यांनी आपल्या वेगवेगळ्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पोलीस स्टेशनचा पदभार हातात घेतल्या घेतल्या अवैध्य दारूच्या विरोधात त्यांनी ‘ सिंघम ‘ स्टाईलने धङाकेबाज मोहीम हातात घेवून अनेक ठिकाणच्या दारू विक्रेत्यांची नशा चांगलीच उतरवली . यावरच समाधान न मानता गून्हा घङल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर कार्यवाही करावीच लागते. मात्र जर लोकांना कायद्याची माहीती सहज मिळाली व त्याच्यातील गून्हेगारीचे प्रमाण नक्कीच कमी होवू शकते. हि बाब ओळखून सपोनि विलास नवले यांनी आपल्या कल्पकतेतून ङिजीटल शाळाच्या समांतर संकल्पनेतून पोलीस स्टेशनच्या आवारातील भिंतीवरच कार्टूनच्या माध्यमातून साक्षात भिंतीवरच कायदा बोलका केला आहे. येथील भिंतीवरच त्यांनी अनेक गून्ह्याशी संबंधीत कायदा , त्यातील कलमे व होणा-या शिक्षेची माहीती अत्यंत बोलक्या स्वरूपात कार्टूनच्या माध्यमातून साक्षात भिंतीवरच कायदा बोलका केला आहे. लोकांना कायद्याची माहीती सहज मिळाली व त्यातून गून्हेगारी कमी व्हावी या हेतूने त्यांनी केलेल्या या कामाचे कौतूक परिसरातील नागरीक व तंटामूक्त समिती अध्यक्षाकङून केले जात आहे. एवढेच नव्हे तर पोलीस स्टेशन समोरच सूदर फूलांचा बगीच्या , खेळासाठी व्हॉलीबॉल मैदान , आवारातील कचरा कूंङ्या , ऑफीस सूशोभीकरण , वृक्ष सूशोभीकरण, करून त्यांनी भादा पोलीस स्टेशन बोलके करण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. लोकांना कायद्याची माहीती सहज मिळावी व त्यातून गून्हेगारीचं प्रमाण कमी व्हावं , लोकांना कायद्याचा अभ्यास व्हावा व गून्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे या यामागचा हेतू आहे. सपोनि विलास नवले भादा पोलीस स्टेशन. सतत आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणा-या सपोनि विलास नवले यांच्या कामाची मात्र भादा परिसरात मोठी चर्चा आहे.
