Spread the love

लातूर ( प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे, यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचे तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथक करीत असताना गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इसम नामे
1) करीम पाशा अमनजी शेख, वय 35 वर्ष राहणार तुंगी, तालुका औसा जिल्हा लातूर
2) गणीपाशा अमनजी शेख, वय 38 वर्ष, राहणार तुंगी तालुका औसा जिल्हा लातूर सध्या राहणार लाल बहादूर शास्त्री नगर लातूर.

यांना स्क्रॅप मार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील विविध भागातून अनेक मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी 4 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
नमूद आरोपीस पोलिस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेले गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/ 2022 कलम 379 भादवी मध्ये दिनांक 18/05/2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभाग लातूर शहर येथील विशेष पथकातील सहाय्यक फौजदार, वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार महेश पारडे, पोलीस ठाणे गांधीचौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोले, पोलीस अंमलदार मुळे, पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!