
चौघांवर गुन्हा दाखल जुळ्या तरुणांना अटक
लातूर ( प्रतिनिधी ) जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा फायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याचा
विचित्र प्रकार लातुरात समोर आला आहे. हा प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर, विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर जुळ्या भावांसह सासू सासऱ्या विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शहरातील रिंग रोड परिसरातील आहे. गतवर्षी एका २० वर्षीय तरुणीचा लातुरातील
एका तरुणाशी विवाह झाला. ज्या तरुणाशी विवाह झाला त्या तरुणास
जुळा भाऊ असून दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे आपला पती व दिर कोणता हे ओळखणेच पीडित विवाहितेला जमले नाही. याचा गैरफायदा घेत पती आणि त्याच्या जुळ्या भावाने तब्बल सहा महिने या विवाहितेवर बलात्कार केला. हा प्रकार विवाहितेच्या लक्षात येताच तिने पतीला याची
कल्पना दिली असता जे सुरु आहे तु सुरू राहू दे असा सल्ला देत पती आणि दिराने हा अत्याचार सुरूच ठेवला. हा प्रकार वैतागलेल्या या विवाहितेने सासू-सासऱ्यांच्या कानावर घातले असता, हे असेच चालणार आहे. तुला नांदायचे आहे की नाही, असे म्हणत तिलाच दम देण्यात आला. काही
दिवसानंतर सदर विवाहिता माहेरी गेली. तिला बोलावण्यासाठी तिचा दीर (जुळा) तिच्याकडे माहेरी गेला. यावेळी तिने सासरी येण्यास नकार दिला.
माहेरच्या लोकांनी तिला सासरी न जाण्याचे कारण विचारल्यानंतर तिने
सासरी सुरू असलेला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या
तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांत गुरनं २२८/२२ कलम ३७६, ३२३, ५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही
जुळ्या भावांना अटक करण्यात आली असून पुढिल तपास सुरू असल्याची
माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक निळकंठे यांनी दिली.