Spread the love

जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

वाढवणा ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 22/05/2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील मौजे हळी येथील एका ज्यूस सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या तिरट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आलेले इसम नामे

1) जावेद इसाक शेख वय 35 वर्ष धंदा मजुरी राहणार खडकगल्ली, हाळी तालुका उदगीर.

2) युनुस मुजम्मिल शेख, वय 35 वर्ष, धंदा मजुरी, राहणार आदर्श कॉलनी, हंडरगुळी तालुका उदगीर.

3) मनोहर नामदेव मसुरे, वय 38 वर्ष, धंदा मजुरी, राहणार बौद्ध नगर, हाळी तालुका उदगीर.

4) अहमदपाशा मैनोद्दीन शेख, वय 36, वर्ष धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

5) खालील शरीफ शेख, वय 33 वर्ष, धंदा शेती, राहणार खडकपुरा, हाळी तालुका उदगीर.

6) महबूब मैनोदीन सय्यद, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर.

7)हमजा सत्तारसाब मोमीन, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

8) अशोक दत्तराव धुपे, वय 47 वर्ष, धंदा शेती, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर.

9) जाकीर पाशासाहेब डांगे, वय 55 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

10) संजय पंढरीनाथ दापके वय 55 वर्ष धंदा शेती राहणार मोरतळवाडी, तालुका उदगीर.

11) बालाजी रंगनाथ पेंढारकर, वय 52 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हळी तालुका उदगीर.

12)दामोदर नागोराव भांगे, वय 65 वर्ष, धंदा शेती, राहणार वाढवणा तालुका उदगीर.

13) जमीर रफिक शेख, वय 29 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

14) बालाजी नामदेव भंडरपे, वय 45 वर्ष, राहणार गादेवाडी तालुका अहमदपूर.

15) जलील मिरासाब शेख, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

16) विक्रम विनोद शिंदे, वय 23 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हळी तालुका उदगीर.

17) शाहरुख शौकत चौधरी, वय 26 वर्ष, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर.

18) सोपान दिगंबर बंडेवाड, वय 47 वर्ष, कोळवाडी तालुका अहमदपूर.

19) नितीन विठ्ठलराव मुळे, वय 30 वर्ष, राहणार सुकणी तालुका उदगीर.

20) अनिल कमलाकरबाई कांबळे, वय 42 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

 यांच्यावर पोलीस ठाणे वाढवणा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/2022 कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वाढवण्याचे पोलीस अंमलदार सारोळे हे करीत आहेत.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री. निकेतन कदम, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात त्यांच्या पथकातील पोलीस ठाणे वाढवणा येथील पोलीस अंमलदार हाके, कलमे, शेख, रायभोळे, गोमारे, पुट्टेवाड, मामडगे, पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!