
लातूर ( प्रतिनिधि ) आज दि-24-06-2022 रोजी लातूर पंचायत समिती येथे नवीन नियुक्त झालेले गट विकास अधिकारी मा. तुकाराम जी भालके यांनी लातूर तालुक्यात सर्वात प्रथम मौजे खोपेगाव गावाला भेट दिली यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा खोपेगावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीमती तेजाबाई मोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल पवार , रवी मोरे , कर्मचार्यांच्या वतीने ग्राम रोजगार सेवक अमोल घायाळ तसेच गावातील अनेक गावकऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मा.गटविकास अधिकारी साहेबांनी संपूर्ण गावाची पाहणी केली या पाहणीमध्ये ग्रामपंचायत , जिल्हा परिषद शाळा , आरोग्य विभाग , मराठवाड्यात फेमस असलेल्या मियावाकी वृक्ष लागवड ला भेटी दिल्या , गावातील विविध विकास कामांची पाहणी केली व राहिलेल्या काही विकास कामाची माहिती घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या की राहिलेले उर्वरित कामे तसेच पावसाळा पूर्वी चे होणारे कामे जसे की नाल्या सफाई , शोषखड्डे , जलपुर्नभरण , मियावाकी वृक्ष लागवड , जिल्हा परिषद शाळेतील विविध कामे बरेच कामांचे नियोजन करून लवकरात लवकर करण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या यावेळी साहेबांनी गावचे ग्रामसेवक , सदस्य व गावकऱ्यांचे विशेष कौतुक केले व आणखी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन दिले. यावेळी गावचे सरपंच श्रीमती तेजाबाई मोरे , उपसरपंच अतुल पवार , ग्रामपंचायत सदस्य विनायक डेंगळे , ग्रामसेवक बनसोडे मॅडम , ग्राम रोजगार सेवक अमोल घायाळ , महेश हनमंते , मधुकर मोरे , अभिषेक मगर आदी उपस्थित होते.
