Spread the love

प्रमोद वाघमारे यांची माहिती

उस्मानाबाद धाराशिव ( प्रतिनिधी )उस्मानाबाद-धाराशिव नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 03 मधून पोलीस लाईन मधील पोलीस बॉईज असोसिएशनचे पुरुष आणि महिला उमेदवार उभे करणार असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे

प्रभाग क्रमांक 03 हा पुरुष अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून महिला सर्वसाधारण साठी आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक न लढवता पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे ही निवडणूक लढवली जाईल असे प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे. प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी 1200 ते 1300 मतदानाची आवश्यकता असून पोलीस लाईन मधील पोलीस परीवारांचे 1500 च्या आसपास मतदान आहे , तसेच पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे आत्तापर्यंत पोलीस कुटुंबियांचे बरेच प्रश्न सोडवले असून पोलीसांच्या देखील अनेक समस्या सोडवून त्यांना न्याय दिला असल्यामुळे या केलेल्या कामाची पावती म्हणून पोलीस बॉईज असोसिएशनचे उमेदवार सहज निवडून येतील असेही प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे,

नगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत पोलीस बॉईज असोसिएशनच्या उमेदवारालाच मतदान केले जाईन व त्यांना निवडून आणले जाईल असे पोलीस लाईन मधे राहणाऱ्या पोलीसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. जे जे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तसेच ज्यांची ज्यांची तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली आहे. अशा पोलीस कुटुंबियांच्या घरी जाऊन आम्ही स्वतःहून भेट घेत असल्यामुळे या सर्व पोलीस परिवाराचा पोलीस बॉईज असोसिएशनला वाढता पाठिंबा असल्याचेही प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे,

त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या अमिषाला बळी न पडता पोलीस बॉईज असोसिएशन संपूर्ण ताकद लावून प्रभाग क्रमांक 03 मधून निवडणूक लढवून आपले दोन्ही उमेदवार निवडून आणणार असा निर्धार प्रमोद वाघमारे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!