Spread the love


लातूर, दि.10 (प्रतिनिधी): जिल्ह्यतील सर्व शेतकऱ्यांना कळविण्‍यात येते की, जिल्‍हा परिषद लातूर सेस फंडातून कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्‍पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर DBT तत्‍वावर देण्‍यासाठी ईच्छूक शेतक-याकडून पंचायत समिती स्‍तरावर अर्ज मागविण्‍यात आले होते.
सदर सर्व औजारासाठी सोडत पध्‍दतीने लाभार्थ्‍याची निवड संबंधीत पंचायत समिती स्‍तरावर शेतक-यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात येणार आहे.
तरी अर्जदार शेतक-यानी 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता आपल्‍या पंचायत समितीच्‍या सभागृहात उपस्थित राहावे असे अवाहन कृषि विकास अधिकारी व अति. मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!