
लातूर जिल्हा व इतरही जिल्ह्यातील पोलिस व होमगार्ड यांच्या पाल्यांना online मोफत शिकवणी
लातूर – (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने BYJU’S ग्लोबल थॉट फाऊंडेशन यांचे पुढाकाराने 271 लातूर पोलिस पाल्यांना विद्यार्थ्यांना मोफत online शिकवणी वर्गाचे नियोजन करून दिले आहे. सदर अभियान महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, सातारा, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यातील आणि इतर जिल्हे असे एकूण 1001 पोलिस पाल्य विद्यार्थ्यांना इयत्ता 4 थी ते 12 वी, स्पर्धा परिक्षा व इतर तत्सम परिक्षांसाठी करण्यात येत आहे.सदर मोफत शिक्षणाचा उपक्रम आयोजक ग्लोबल थॉट फाऊंडेशनच्या वतीने पुढील 3 वर्षा करिता आहे. या व्यतिरिक्त करिअर गायडन्स व मार्गदर्शन चे शिकवणी वर्ग घेण्यात येणार आहेत. लातूर पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आयोजकांना फार मोलाचे सहकार्य लाभलेले असल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी करता येत आहे. ग्लोबल थॉट फाउंडेशन चे विश्वस्त व ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती विजयाताई चंद्रकांतराव मानकोसकर म्हणाले की ” ग्लोबल थॉट फाउंडेशन ही संस्था अनेक वर्षा पासून समाजसेवेत रुजू आहे. कोरोना महामारीच्या कार्यकाळात पोलिस यंञणेकडून चांगले सहकार्य लाभलेले आहे .
पोलिस दलाला मानवंदना म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आहे.
लातुरात लवकरच संस्थेचे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून शिकवणारे सर्व कोर्स मोफत असणार आहे. ह्यात सर्व प्रकार चे कॉम्प्युटर कोर्स, महिलान साठी शिवणकाम व बेकरी पदार्थ शिकवणी दिली जाईल. लातूर जिल्ह्यात कॅन्सर चे वाढते प्रमाण बघता GTF आणि टाटा ट्रस्ट येत्या काही दिवसात आरोग्य शिबीर आयोजित करणार आहे. कोरोना काळा नंतर समाजात बेरोजगारी वाढली आहे. म्हणून बेरोजगारी ला आळा घालण्यासाठी साठी GTF व लातूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विधमाने येत्या २८ ऑगस्टला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातलेत संस्था उपस्थित राहणार आहे”. श्रीमती विजयाताई चंद्रकांतराव मानकोसकर ह्यांना अनेक लोक प्रेमाने आई म्हणून संबोधतात.त्यांच्या या सामाजिक कामाला लातूर पोलिसांचा सलाम.
