Spread the love
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद ची संयुक्त कारवाई.

चोरीच्या तेरा गुन्ह्याची उकल .


लातूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 09/07/2022 ते 10/08/2022 चे दरम्यान श्रीनिकेतन सोसायटी, लातूर येथील एका घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे दागदागिने व रोख रक्कम असा 23 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेले वगैरे तक्रारीवरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे दिनांक 11/07/2022 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 404/2022 कलम 454, 457,380 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता  पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लातूर तसेच पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सदर पथके गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने बातमीदार तयार करून त्यांच्याकडून माहिती मिळवून तसेच इतर भौतिक दूव्यांचा विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता अहोरात्र परिश्रम घेत होते.दरम्यानच्या काळात दिनांक 23/07/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून  गुन्ह्यातील संशयित आरोपी आरोपी नामे

1) लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड, वय 29 वर्ष, राहणार साठे नगर,परळी वेस अंबाजोगाई सध्या राहणार काळेवाडी, थेरगाव गावठाण, चांदणी चौक, बापूजी बुवा मंदिराजवळ, पिंपरी चिंचवड, पुणे.

2)किशोर उर्फ पप्पू काशिनाथ जोगदंड, वय 39 वर्ष, राहणार साठे नगर, परळी वेस अंबाजोगाई, सध्या राहणार, लोणी काळभोर, कोळपे वस्ती, पुणे.

3) प्रवीण उर्फ डॉन्या चंद्रकांत माने, वय 31 वर्ष, राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड.
यांना त्यांचे राहते जागेवरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारासह वर नमूद गुन्हा चोरी केल्याचे कबूल केले.
त्यांनी वर नमूद गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाला पैकी 1 लाख 20 हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली एक कार असा एकूण 7 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला व दिनांक 24/ 07/2022 रोजी वर नमूद करण्यात आले होते.
गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात नमूद अटक आरोपीकडे तपास केला असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अनेक गुन्हे केल्याचे सांगितले. त्यावरून वरिष्ठाचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पथक उर्वरित आरोपींच्या शोधासाठी मिळालेल्या माहितीचे संकलन व विश्लेषण करून नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात रवाना करण्यात आले होते. उर्वरित आरोपींचा व मुद्देमालाचा शोध घेत असताना पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पथकाला मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपी नामे
1) सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे, वय 34 वर्ष, राहणार गांधीनगर,अंबाजोगाई,बीड.

2) अविनाश शंकर देवकर, वय 29 वर्ष राहणार वडारवाडा अंबाजोगाई जिल्हा बीड.

3) सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिशन गंगणे, वय 39 वर्ष ,राहणार उत्तर विहार गल्ली आंबेडकर चौक ,अंबाजोगाई जिल्हा बीड.

4) सुदर्शन उर्फ सोन्या विठ्ठलराव माने,वय 23 वर्ष, राहणार सुभाष चौक परळी वैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड.
यांना अतिशय शीताफितीने नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमे लगतच्या भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी अगोदरच अटक केलेल्या आरोपी सोबत मिळून घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाला पैकी सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, मंगळसूत्र बांगड्या, सोन्याची बिस्किट, असा एकूण 18 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करून नमूद आरोपींना दिनांक 01/08/2022 रोजी वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास करत असताना विवेकानंद चौक पोलिसांनी नमूद आरोपीकडून
1) पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील घरफोडीचे 8 गुन्हे.
2) पोलीस ठाणे एमआयडीसी येथील 02 गुन्हे
3)पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील 01 गुन्हा
4) पोलीस ठाणे भोकर जिल्हा नांदेड येथील 01 गुन्हा
5) पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर जिल्हा बीड येथील 01 गुन्हा
असे एकूण घरफोडीचे 13 गुन्हे उघडकीस आणून त्यांनी विविध गुन्ह्यात चोरलेला एकूण 900 ग्रॅम इतक्या वाजण्याचे सोन्याचे दागिने व 500 ग्रॅम चांदीचे वस्तू व रोख रक्कम त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 52 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
सदर आरोपी पैकी आरोपी नामे सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे याचे विरुद्ध औरंगाबाद व बीड या जिल्ह्यात मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. व त्याचे विरोधात विविध जिल्ह्यात मालाविषयक व शरीराविषयी असे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नामे सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिशन गंगणे याचे विरुद्ध बीड जिल्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाली असून त्याचे विरुद्ध विविध जिल्ह्यात मालाविषयक व शरीराविषयी एकूण पाच गुन्हे दाखल आहेत
आरोपी नामे अविनाश शंकर देवकर यांची विरुद्ध मालाविषयक व शरीर विषयक असे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.
लखन जोगदंड याचे विरुद्ध 30 गुन्हे तर प्रवीण उर्फ डॉन याचे विरुद्ध 12 गुन्हे दाखल आहेत.
सदरचे आरोपी मला विषयक गुन्हे करण्याच्या सवयीचे अट्टल गुन्हेगार असून लातूर पोलिसाने अतिशय कुशलतेने सदर गुन्ह्याचा तपास करून इतर 13 गुन्हे उघड केस आणून 52 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांचे संयुक्त पथकाने यवतमाळ, नांदेड पोलिसांच्या मदतीने केली असून त्यामध्ये पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, उदय सावंत, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, बालाजी गोणारकर, हाजी सय्यद, भाऊसाहेब बुड्डे पाटील, पोलिस अमलदार विलास फुलारी,मुन्ना पठाण, संजय कांबळे, रामलिंग शिंदे, दयानंद सारोळे, रमेश नामदास, खंडू कलकत्ते, विनोद चलवाड, दिनेश हवा, नरेंद्र भुजबळ, अशोक नलवाड, नारायण शिंदे, किशोर पुरी वेंकुराम मरे ,विशाल मुंडे, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांची टीम, सायबर सेल लातूर येथील पोलीस निरीक्षक अशोक बेले, सहायक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, पोलीस अमलदार संतोष देवडे, गणेश साठे,यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
तसेच सदर पथकास नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे व त्यांच्या टीमने मोलाची मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!