

चाकूर : ( प्रतिनिधी) आपल्या कडे एक म्हण प्रचलित आहे, कावळा केला कारभारी —– आणला दरबारी अशीच एक घटना घडली आहे , रेणापूर तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली. सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री.निकेतन कदम व त्यांचे सहकारी यांनी दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हद्दीतील धक्कादायक मारहाण केलेल्या फोटो समोर आले आहेत.दिनांक १६ तारखेला निकेतन कदम व त्यांचे सहकारी यांनी रेणापूर तालुक्यातील एका क्लब वर सायंकाळी ५ वाजता अवैध तिर्रट जुगार चालू आहे म्हणत छापा टाकला व ३९ आरोपी विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला , व त्या कारवाईत पकडण्यात आलेल्या सर्वच आरोपीला अमानुष पणे मारहाण करण्यात आली आहे , आज दिनांक १८ रोजी क्लब चालक कल्याण बदणे यांनी माझे क्लब हे अधिकृत आहे व प्रतेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे असताना देखील सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व त्यांचे सहकारी येवून छापा टाकून ३९ खेळणाऱ्यावर कारवाई केली, व त्यांना पोलीस ठाण्यात अमानुष पणे मारहाण देखील करण्यात आली आहे ,अशी तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दिली आहे .व सोबत मारहाण झालेले फोटोही दिले आहेत या फोटोत निकेतन कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंद खोलीत अनेक व्यक्तीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक कदम यांच्याविरोधात यापूर्वी सुद्धा अनेकांनी तक्रारी चा सुर उमटवला आहेत. विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे त्या पोहचल्या सुद्धा असतील . मात्र, असं असून सुद्धा निखिल पिंगळे हे गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोत निकेतन कदम यांच्या सहकाऱ्यांनी बंद खोलीत अनेक नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचं दिसून येत आहेत.दरम्यान, यापूर्वी देखील निकेतन कदम यांनी वाढवणा हद्दीत गुटखा व जुगारावर कारवाई करत असताना तरुणांना व कामगाराना मारहाण केल्याचं बोलल जात आहे . तरी सुद्धा सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन यांची ही मुजोरी सुरूच आहे. यावर पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी काय कारवाई करतात ? या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे .
