लातूर ( प्रतिनिधी) आज दिनांक आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी नियमाने 15 ऑगस्ट ला घेण्यात येणारी ग्रामसभा हे 25 ऑगस्टला ठेवण्यात आली होती परंतु नेहमी प्रमाणे कोरम पूर्ण न झाल्यामुळे ती ग्रामसभा 29 ऑगस्ट ठेवण्यात आली होती आज या ग्राम सभेला कोरम पेक्षा ही जास्ती च्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत अनेक विषय होते , त्या मध्ये तंटा मुक्ती अध्यक्ष निवडी चा पण विषय ठेवण्यात आला होता त्या विषया नुसार अध्यक्ष पदा साठी चार उमेदवार इच्छुक होते परंतु त्यातील दोन जणांनी माघार घेतली त्यामुळे राहिलेल्या दोघात चर्चा करून बिनविरोध एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असे ठरवण्यात आले त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मा.श्री हनंमत मुरलीधर मोरे यांची तर उपाध्यक्षपदी मा.श्री अर्जुन गणपती शिंदे यांची सर्व ग्रामसभा समक्ष बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक मॅडम , सरपंच तेजाबाई मोरे , जिल्हा साहित्य मुद्रणालय सहकारी संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मोरे , गावचे चेअरमन हणमंत पवार , गावचे पोलीस पाटील दिनकर सूर्यवंशी , उपसरपंच अतुल पवार , ग्राम पंचायत सदस्य विनायक डेंगळे, बालाजी म्हेत्रे , ग्राम रोजगार सेवक अमोल गोरख घायाळ , गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव मोरे , किसन मोरे , शिवाजी मोरे , विजय मोरे जीवन मोरे , जगन्नाथ शिंदे , प्रदीप मोरे , परमेश्वर पवार , शशिकांत मोरे , दामोदर शिंदे , महेश हणमंते , हणमंत झिरमिरे , योगेश मोरे , अक्षय मोरे आदि गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.