
लातूर ( प्रतिनिधी ) लातूर येथील जय क्रांती महाविद्यालयात इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गीता वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इंग्रजी विषयांमध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव गोविंदराव घार प्राचार्य डॉक्टर दिलीप गुंजरगे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
