Spread the love

औराद शहाजानी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

निलंगा ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/07/2022 ते दिनांक 25/07/2022 रोजीचे दरम्यान पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 7 लाख 26 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहे. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन औराद शहाजनी येथे गुरनं 154/2022 कलम 454, 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा श्री.दिनेशकुमार कोल्हे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांचे नेतृत्वात गेला माल व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देऊन तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारावरून औराद शहाजानी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीना दिनांक 25/07/2022 रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुल केले व गुन्हात चोरलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम 50,000 रु. असे एकूण 7,26,700 रू मुद्देमाल काढून दिला होता. वरिष्ठांचे निर्देशान्वये कायदेशीर बाबींची पूर्तता करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 07 लाख 26 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल दिनांक 30/08/2022 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा श्री.दिनेश कुमार कोल्हे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप कामत यांच्या उपस्थीतीत पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्याना मुद्देमाल परत देण्यात आले. चोरीस गेलाल माल पुन्हा मिळाल्याने नागरीकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!