गावात ग्रामपंचायत ठिकाणी व रास्त भाव दुकानाचे महिन्यापासून
आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे इकेवायसी करुन घ्यावी —जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन
लातूर दि.20( प्रतिनिधी ) पुढील महिन्यापासून आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे तात्काळ इकेवायसी करुन घेणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गावात ग्रामपंचायत ठिकाणी व रास्त भाव दुकानाचे ठिकाणी इकेवायसी नसलेल्या लाभार्थी यांची यादी डकविण्यात आलेली आहे. सदर यादीचे अवलोकन होवून इकेवायसी नसलेल्या लाभार्थी यांचे शंभर टक्के आधार सिडींग पूर्ण होईल, याची दक्षता घेणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने तसेच तालुका स्तरावरुन तहसीलदार स्पनील पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
लातूर तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना कळविण्यात येते की, आपल्या कुटुंबातील रेशनकार्ड मधील ज्या सदस्याच्या नावापुढे आधार क्रमांक समाविष्ट नाही, अशा नावासमोर आधार क्रमांक समाविष्ट करण्यासाठी आपल्या कुटुंबातील ज्या सदस्यांचे आधार सिडींग झालेले नाही, अशा सदस्यांनी आपले आधार कार्ड घेवून आपआपल्या रास्त भाव दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवरती तात्काळ इकेवायसी करुन घ्यावी.
याबाबत अन्न, नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांनी पात्र लाभार्थी यांच्या ऑनलाईन रेशन कार्डमधील ज्या सदस्याच्या नावापुढे आधार क्रमांक समाविष्ट नाही, अशा नावासमोर आधार क्रमांक समाविष्ट करणे आत्यावश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के आधार सिडींग करण्यासाठी आपआपल्या रास्त भाव दुकानामध्ये जाऊन आपले इकेवायसी करुन घेण्याबाबत कळविले आहे.
