चाकूर ( प्रतिनिधी) रोहिना येथे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी अंबिका देवी यात्रेस सोमवार पासून सुरुवात होणार असुन, घटस्थापना झाल्यावर याञा महोत्सवास सुरवात होईल, पंचक्रोशीतील व कर्नाटक राज्यातील भाविक भक्त दररोज दर्शनासाठी येत असतात, त्या निमित्ताने ग्रामपंचायत च्या वतीने भाविकांना अन्नदानाची सोय केली जाते , भक्तगणांना कुठलाही ञास होणार नाही असे ग्रामपंचायत मार्फत सर्व नियोजन केले जाते. प्रशासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक कर्डिले, पोलीस पाटील केंद्रे, तलाठी जोशी गिरधावर मॅडम, यांचे देखरेखीत मंदिराची सर्व काम असते. रोहिना येथील ग्रामपंचायत सरपंच वैजनाथ जिवलगे उपसरपंच पद्मावती केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र नागरगोजे, विलास कांबळे, गणपत केंद्रे, पंडितराव केंद्रे, भागवत केंद्रे, सुरेश मुंडे, बाळासाहेब केंद्रे व ज्यांनी या देवीसाठी मोलाचे कार्य केले व ते माजी कै.सरपंच त्र्यंबकरावजी केंद्रे, कै.अंग तात्या, अच्युत केंद्र, अहमद शेख,बालाजी संजू केंद्रे, मधुकर वाघमारे, अरविंद सरपंच, विठ्ठल डोंगरे व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने तेथे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार चाकूर, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाकूर, पोलीस निरीक्षक चाकूर , यांच्या देखरेखीखाली पोलीस बंदोबस्त दिला जातो. अंदाजे दीड ते दोन लाख भाविक भक्त नवरात्र मध्ये दर्शनासाठी येतात.
