
कळंब (प्रतिनिधी राहुल ) दि 05/10/2022 रोजी 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरात सर्व बौद्ध बांधवांनी आयोजित करण्यात आलेली धम्मरॅली यशस्वी व उत्साहात कळंब शहरातील विविध भागातील बौध्द बांधवांनी यशस्वी पार पडली या धम्मरॅली साठी शहरातील व परिसरातील महिला मुली तसेच जेष्ठ व असंख्य तरूणांनी हजेरी लावली होती धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघालेल्या धम्म रॅली ची सुरुवात समता नगर (पु.) सावरगाव कळंब येथील बौध्द विहारापासून सकाळी 9.30 वाजता सूरूवात करण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक छ शिवाजी महाराज चौक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत शिस्त बद्ध एका ओळीत आली धम्म रॅली मध्ये बौध्द समाजातील ज्येष्ठ नागरिक महीला तरुण मूले यांनी तथागत गौतम बुद्धाच्या तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर व कळंब शहर दणाणले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लहान मुलींच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले पुज्य भन्ते सुमेधजी नागसेन यांनी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना धम्मदेसना दिली जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शेवटी पूज्य भन्तेजी च्या प्रवचनाने व पंचशील घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला स्टेजवर भक्त पुजनीय भन्तेजी व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीचा समावेश नव्हता ही रॅली कोणत्याही पुढारी किंवा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली नसून सर्व समाज बांधवांनी धम्मरॅली चे नेतृत्व केले आहे रॅलीला येताना प्रत्येक कुटुंबाने धम्म ध्वज सोबत घेऊन सर्व कुटुंब व सगेसोयरे यांना सोबत घेऊन आले होते धम्म रॅली मध्ये शुभ्र वस्त्र परिधान करुण सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच प्रतिष्ठित नागरिक तसेच लहान मुले यांची उपस्थिती लक्षणीय होती ही धम्म रॅली अतिशय शांत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन बद्ध निघाल्या मुळे सर्व समाज बांधवांचे आभार संयोजन समिती तर्फे करण्यात आले.