लंपास करणारा तो झारीतील शुक्राचार्य कोण ?

रेणापूर( प्रतिनिधी ) लातूर-ते पानगाव रेणापूर मार्गे जात असलेल्या कंटेनरमधुन तब्बल एक्कीवीस लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले होते . ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पानगाव परिसरात करण्यात आली. या प्रकरणी चालका सहीत दोघांविरुध्द रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतू या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागणार असल्याची माहिती काही कर्मचारी गुणगुणत आहेत .पकडण्यात आलेल्या गुटख्याच्या पोत्यातून २४ बॅग कार्यवाही करण्याच्या पहिलेच लंपास करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.या गुटख्याच्या बॅग ची किंमत तब्बल चार लाख रुपये असल्याचे समोर येत असल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे. या बाबतीत संपुर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार चवीने चर्चा होत असताना दिसत आहे.रेणापूर पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरुन , एम.एच. १४ जी. डी. ४१५० या कंटेनरमधून रेणापूर पानगाव मार्गावरून धर्मापुरीकडे अवैध गुटखा घेवुन जात असल्याने रेणापूर पोलीसांनी पानगावपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ सापळा लावला. अवैध गुटखा घेवुन जाणाऱ्या कंटेनर थांबवून वाहन चालकाची चौकशी करण्यात आली. अधिकची माहिती घेतली असता कंटेनर चालकाने वाहनात गुटखा असल्याचे सांगितले त्यावरून पोलीसांनी कंटेनर तपासणी करण्या करता अन्न औषध प्रशासन विभागाला कळवले त्यांना येण्यासाठी वेळ लागनार होता , तेवढ्याच वेळात या गुटख्याच्या २४ बॅगा लंपास झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही कर्मचार्यांचाही हात असल्याचे बोलले जात आहे. १५० बॅगा पैकी दाखविण्यात आले फक्त १२६ बॅग गोवा व ६० बॅग वजीर गुटखा त्यामुळे आता नव्यानेच रुजु झालेल्या पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांना आपल्यातलेच झारीतील शुक्राचार्य शोधावे लागतील. अशी जोरदार चर्चा लातूर जिल्ह्यात होत आहे. या विषयावर पोलिस अधिक्षक सोमय मुंडे काय कार्यवाही करणार का ? झारीतील शुक्राचार्यला लगाम लावतील का ? याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

