मौजे देवळाली ता जि उस्मानाबाद येथील जि प शाळेच्या 8-अ अंतर्गत
उस्मानाबाद ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली जिल्हा परीषद प्रा शाळेच्या 8 अ
अंतर्गत गावातील सरपंच ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने बांधकाम सुरु असल्याची तक्रार नागनाथ कांबळे यांनी मुख्यकार्यकारीअधिकारी जिल्हा परीषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांना दिनांक 30/05/2022रोजी दिली होती या अर्जानुसार मा
शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यानी विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी अहवाल सादर केल्यानंतर मां शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना बांधकाम थांबवुन गुन्हा नोंद करण्याकरीता कळविले तसेच मा जिल्हाधिकारी व उपमुख्यकार्यकारी उस्मानाबाद यांनी पोलीस अधिक्षक
यांना कारवाई करण्याबाबत कळविलेले असताना 3 महिणे झाले तरी या तिघांनी कसल्याही प्रकारची कारवाई करण्याकरीता पाऊल उचलण्याची तसदी घेतलेली नाही याउलट मुख्याध्यापक यांनी शाळेची जागा बरोबर असुण कसल्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही असे चुकिचे व दिशाभुल
करणारा अहवाल दिला आहे तर ग्रामसेवक व सरपंच यांनी या वरीष्ट कार्यालय व अधिकारी यांच्या पत्राला व सुचणेला केराची टोपली दाखविली आहे यावरूनच स्पष्ट होते की अतिक्रमण करणार्या व्यक्तीस या तिघांचा देखिल भक्कम पांठीबा असल्यामुळे हे सर्वजन कारवाई करण्यास चालढकल करीत आहेत ,म्हणून बहुजन सोशालिस्ट पार्टीचे उस्मानाबाद जिल्हा महासचिव आप्पासाहेब भगवान सिरसाठे यांनी दिनांक= 01/09/2022 रोजी या सर्व प्रकरणाची सत्यता काय हे लोक कोणत्या राजकिय पुढार्याच्या किंवा वरीष्ट कार्यालयतील
अधिकारी यांच्या दबावाखाली तर कारवाई करित नसतील या बाबतची देखील सखोल चौकशी होऊण योग्य कारवाई करण्यासाठी प्रथम सरपंच ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्यार कडक कारवाई कण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनात शाळेच्या चारी बाजुला रिकामी जागा असल्याबाबत कुठेही उल्लेख नसल्याचे देखील कळविले आहे शाळेच्या
सभोवती रिकामी जागा नसताना खाजगी माणसाला बांधकाम सुरु केल्यापासुण पुर्ण होईपर्यंत डोळेझाक केल्यामुळे यां तिघावर सार्वजनिक मालमत्ता कायदा 2005 नुसार कडक कारवाई कण्याबाबत चे निवेदन आप्पासाहेब भगवान सिरसाठे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांना
निवेदनाद्वारे केली आहे.
