Spread the love


उस्मानाबाद,दि.01(श्रीकांत मटकीवाले ):- आपले आरोग्य हे आपल्या हातात असून त्या विषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एड्स सारखा जीव घेणा आजार हद्दपार करण्यासाठी संकल्पबध्द होण्याची आवश्यकता आहे.असे देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी आज येथे केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या वतीने आज दिनांक १ डिसेंबर जाबतिक एड्स दिन २०२२ च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एचआयव्ही/ एड्स जनजागृती भव्य प्रभात फेरीचे उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती पवार, यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. तसेच रांगोळी व चित्रकला स्पर्धेतील विजेते आणि सन २०२१-२२ मधील उत्कृष्ट काम केलेल्या केंद्राच्या टिमचे मंत्री महोदयांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती मध्ये पोलिस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल गुप्ता, अपरजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, अधिष्ठाता, डॉ. उज्ज्वला गवळी, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे पाटील, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक, डॉ.तानाजी लाकाळ, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. कुलदीप मिटकरी, नोडल अधिकारी एआरटी, डॉ. सचिन देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. रफिक अन्सारी, प्राचार्य नर्सिंग कॉलेज, अमोल गरड, अध्यक्षा महिला डॉक्टर विंग, डॉ. ललिता स्वामी, सचिव महिला डॉक्टर विंग, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. निता पौळ, डॉ. स्मिता सरोदे, डॉ. हिराकांत जाधव, जिल्हा विस्तार मध्यम अधिकारी, रेणूका राठोड, श्री उध्दव कदम जिल्हा कार्यक्रम अधिकारी महादेव शिनगारे, जिल्हा पर्यवेक्षक अदिची उपस्थिती होती.


यावेळी मंत्री महोदया यांनी उपस्थित युवकांना जागतिक एड्स दिनाचे ब्रीद वाक्य “आपली एकता आपली समानता एचआयव्हीसह जीवन जगणा-या करिता” याबाबत संवेदना मार्गदर्शन केले. तसेच आयएमए-महिला डॉक्टर विंग यांच्या वतीने स्वाक्षरी अभियान मा. मंत्री महोदयांच्या हस्ते या वर्षीचे घोषवाक्य लिहुन कटिबधता स्वाक्षरी अभियान मोहिमीचे उद्घाटन करण्यात आले. प्रभात फेरीची सांगता तुळजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद या ठिकाणी सर्व महाविदयालयीन विद्ययार्थीच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शासकीय नर्सिग कॉलेज च्या विद्ययार्थीनी “चला एचआयव्ही/ एड्स चे निर्मुलन करु या” या विषयावर भारुड लोककलेच्या माध्यमातुन जागृती सादरीकरण केले. याप्रभात फेरी मध्ये उस्मानाबाद शहरातील जिल्हा शासकिय नर्सिंग कॉलेज,आरपी कॉलेज, के. टी. पाटील फार्मसी कॉलेज, के. टी. पाटील नर्सिंग कॉलेज, सहयाद्री नर्सिंग कॉलेज, बील गेट्स नर्सिंग कॉलेज, तेरणा महाविद्यालय, काझी नर्सिंग कॉलेज, घोगरे नर्सिंग कॉलेज,छात्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथील युवक युवती यांनी प्रभात फेरीत सहभाग नोंदवून एचआयव्ही/ एड्स प्रतिबंध बाबतच्या विविध घोषणांनी प्रभात फेरी यशस्वी केली. कार्यक्रम प्रसंगी डॉ. भारती पवार , यांचे स्वागत डॉ. राजाभाऊ गलांडे पाटील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उध्दव कदम जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले, व सुत्रसंचालन संतोष पोतदार यांनी केले व आभार महादेव शिनगारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डापकू, आयसीटीसी, एआरटी, एसटीआय व विहान सामाजिक संस्था, रुग्णालयातील अधिपरिचारिका, १०८ अम्बुलन्स चे जिल्हा समन्वयक इ. सर्वांचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!