Spread the love

पोलीस ठाणे एमआयडीसी ची कामगिरी.

लातूर (प्रतिनिधी) दिनांक 27/02/2023 रोजी बार्शी रोड, लातूर येथून एका ऑटो चालकास एका अज्ञात प्रवासी ने बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथे भाड्याने घेऊन जाऊन रस्त्यामध्ये थांबवून ऑटो चालकास मारहाण व शिवीगाळ करून त्याच्या कडील ऑटोरिक्षा व मोबाईल जबरदस्तीने घेऊन पळून गेले बाबत पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 143/2023, कलम 392, 323, 504 भा.द.वि. (शिवीगाळ व मारहाण करून लुटणे) या कलमाखाली अज्ञात आरोपी विरुद्ध 28 फेब्रुवारी च्या मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण चार्ज लातूर शहर) श्री. सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक श्री. गोरख दिवे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादी कडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करुन पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे 

1) अक्षय प्रभाकर कणसे, वय 23 वर्ष, राहणार, वाल्मिकी नगर ,लातूर.

            यास गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात त्याचा शोध घेऊन पहाटे 3 ते 4 वाजण्याचे दरम्यान त्याचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने बार्शी रोड, लातूर येथे एका थांबलेल्या ऑटो पॉईंटवर थांबलेल्या ऑटोरिक्षा चालकास मेडिकल कॉलेजला भाड्याने घेवून जावून  आपल्याला बर्दापुर येथे जायचे आहे असे सांगून बर्दापुरफाटा रस्त्यावर थांबून भाड्याचे पैसे न देता मारहाण,शिवीगाळ करून त्याचे कडील मोबाईल व ऑटो चोरल्याचे कबूल करून सदरचा मोबाईल व लपवून ठेवलेला ऑटोरिक्षा असा एकूण 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
      वर नमूद आरोपीस गुन्हात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन एमआयडीसी चे सफौ मुळे हे करीत आहे.
       सदर गुन्ह्यातील आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून अक्षय प्रभाकर कणसे याचेवर लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे ला मालमत्ता चोरीचे व शरीराविषयीचे 07 गंभीर गुन्हे दाखल आहे.
             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत, पोलिस उप निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, संदीप कराड, अतुल डाके, पोलीस अंमलदार भिमराव बेल्लाळे, गोविंद चामे, भागवत मुळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!