Spread the love

. पोलीस ठाणे एमआयडीसीची कामगिरी.
लातूर ( प्रतिनिधी ) दिनांक 01/03/2023 रोजी लातूर शहरातील एक तक्रारदाराने पोलीस ठाणे एमआयडीसी ला तक्रार दिली की, ते दिनांक 28/02/2023 रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास नमूद फिर्यादी हे घरी जाण्यासाठी खाडगाव रोड परिसरात थांबले असता 4 अनोळखी व्यक्ती मोटरसायकलवर येऊन फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, कत्तीने मारून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या खिशातील 10 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. वगैरे तक्रार वरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे क्रमांक 148/ 2023 कलम 394 ,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता सूचना व मार्गदर्शन करून अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या पथकाने फिर्यादीने सांगितलेल्या वर्णन व चेहरेपट्टीवरून गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे
1) ऋषिकेश रामकिसन सूर्यवंशी, वय 25 वर्ष, राहणार दादोजी कोंडदेव नगर, रिंग रोड लातूर.
2)आदित्य राजकुमार धबडगे , वय 18, वर्ष राहणार दादोजी कोंडदेव नगर,रिंग रोड लातूर.

यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे इतर दोन साथीदारासह मिळून केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम 10,000/- रुपये, गुन्ह्यात वापरलेली एक लोखंडी कत्ती जप्त करून त्यांना नमूद गुन्ह्यात दिनांक 04/03/2023 रोजी अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित इतर दोन आरोपींचा पथकामार्फत शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक संदीप कराड, सहायक फौजदार सर्जेराव जगताप पोलीस अमलदार भिमराव बेल्लाळे, अर्जुन राजपूत, गोविंद चामे, मयुर मुगळे, मोतिराम घुले, मंन्मथ धुमाळ, निलेश जाधव,राम जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!