२०१७-१८ च्या धोरणा नुसारच यावर्षीही कर आकारणी मनपाची माहिती
लातूर(प्रतिनिधी)-२०१७-१८ यावर्षी महानगरपालिकेकडून शहरातील मालमत्तांची मोजणी करून कर आकारणी करण्यात आली होती.यावर्षीही त्याच दराने कर आकारणी करण्यात आलेली असून कुठलाही वाढीव कर लावलेला नाही,अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. मार्च अखेरीस मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महानगरपालिकेकडून नोटीसा दिल्या जातात.त्यानंतर यावर्षी मनपाने मालमत्ता कर वाढविला असल्याची चर्चा सुरू झाली होती.वास्तवात मागील काही वर्षात मनपाने करवाढ केलेली नाही.यावर्षीही जुन्या दरानेच कर आकारणी करण्यात आलेली आहे.ज्या मोठ्या निवासी इमारतींचे क्षेत्रफळ १२५चौरस मीटर पेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी शासनाने स्वतंत्रपणे १० टक्के कर आकारलेला आहे. ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यूनुसार हा कर आकारला जातो.सरसकट सर्वच इमारतींसाठी हा कर नसतो.राज्य शासनाने लावलेला हा कर महानगरपालिकेला मिळत नाही तर नागरिकांकडून तो वसूल करून शासनाला देण्याचे काम पालिकेकडून केले जाते. मनपाकडून कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही. तरी नागरीकानी कसलाही संभ्रम न बाळगता कराचा भरणा करावा असे आवाहन मनपा आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे
