निलंगा(प्रतिनिधी) – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीसह जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांचा गौरव वाढविण्याकरीता भाजपा व शिवसेनेच्या वतीने राज्यातील 288 मतदारसंघात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच निलंगा मतदारसंघाअंतर्गत निलंगा शहरात आज दि. 06 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या गौरव यात्रेत मराठवाड्याचे यात्रा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सहभागी होणार असून या यात्रेत भाजप व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हिंदुप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे व शहराध्यक्ष अॅड. विरभद्र स्वामी यांनी केले आहे.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिलेले आहे. मात्र काँग्रेसकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार्या काँगे्रस सोबत उद्धव ठाकरे यांनी युती करून हिंदुत्वाच्या विचाराला तिलांजली दिली आहे. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणार्या काँग्रेस नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तसे धाडस दाखविले जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीसह जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा व शिवसेनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. राज्यातील 288 मतदारसंघात ही यात्रा काढण्यात येत असून मराठवाड्यासाठी या यात्रेचे संयोजक म्हणून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघातील या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज दि. 6 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता निलंगा शहरात ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. निलंगा शहरातील जनसेवा कार्यालयापासून या यात्रेचा शुभारंभ होणार असून या यात्रेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर हेही सहभागी होणार आहेत. या यात्रेत भाजपा सह शिवसेनेेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटना व हिंदुप्रेमी नागरीकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शहराध्यक्ष अॅड. विरभद्र स्वामी, भाजयुमो शहराध्यक्ष तम्मा माडीबोने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले आहे.
