

लातूर दि ३१ { दिपक पाटील } लातूर शहरातील वाहतूक शाखा ही लातूर शहरातील होणारी वाहतूक सुरळीत रहावी या करीता दिवसभर दिलेल्या ठिकाणी उभा टाकून वाहतूक सुरळीत करत असतात व पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चार्ली हे आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत काही अनुचित प्रकार घडू नये या साठी दिवसराञ पेट्रोलिंग करत असते या कामाचे सामाजिक बांधिलकीतून काही तरी करायला पाहीजेत या भावनेतून सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या भावनेतून स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा चन्द्र नगर व अंबाजोगाई रोड येथील शाखा यांनी कर्मचाऱ्यांना १०० रेनकोट देण्यात आले. आज दिनांक ३१~०८~२१ रोजी सकाळी मा.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपाधीक्षक शहर जितेंद्र जगदाळे व ग पोलीस उपाधीक्षक ग्रामीण प्रिया पाटील व स्टेट बॅकेचे मॅनेजर व कर्मचारी यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना रेनकोट चे वाटप करण्यात आले तसेच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते वाहतूक नियमावली जनजागृती पञकाचे अनावरण करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सुनील बिर्ला यांच्या देखरेखीत सागर झुंजे, रवी कांबळे, जयराज गायकवाड, विनोद तरडे यांनी कार्यक्रम यशस्वी केला यात वाहतूक शाखेतील तसेच सर्व पोलिस ठाण्यातील मोटरसायकल चार्ली कर्मचारी उपस्थित होते.
