Spread the love

लातूर(प्रतिनिधी): लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून मागील १२ दिवसांपासून स्वच्छतेची कामे गतीने केली जात आहेत.दि.५ जून पूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट मनपाच्या स्वच्छता विभागाने ठेवले आहे.

    लातूर मनपाच्या कार्यक्षेत्रात ५० मोठे व लहान ६५ असे एकूण ११५ नाले आहेत.या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी मनपाने २ मोठे व ४  छोट्या जेसीबीसह ५ हायवा अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.या यंत्रांच्या माध्यमातून स्वच्छता केली जात आहे.आज पर्यंत प्रभाग क्रमांक १ मधील नांदगाव वेस परिसरातील नाला तसेच प्रभाग क्रमांक २ मधील ताजोद्दीनबाबा नगर,गाजीपुरा व एसओएस परिसरातील नाल्याची स्वच्छता करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील साबदे यांच्या शेतातील मोठा नाला तसेच प्रभाग क्रमांक ३ व ४ च्या सीमेवरील चलवाड नगर येथील नाला आणि विवेकानंद चौक ते चिल्ले कॉम्प्लेक्स येथील नाल्याची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक १० मध्ये औसेकर यांच्या घरापासून ते स्टार फर्निचर पर्यंतचा नाला, नवीन एमआयडीसी रस्त्यावरील नाला तसेच इंडिया नगर परिसरात भारसंगे हॉस्पिटल ते चंदू हॉटेल पर्यंतच्या नाल्याची स्वच्छताही पूर्ण झाली आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये सुतमिल रोड पासून मधुमीरा फंक्शन हॉल पर्यंत एका बाजूने असणारा नाला तसेच ते एसएससी बोर्डा पर्यंत असणारा नालाही स्वच्छता विभागाने पूर्णतः स्वच्छ केला आहे.प्रभाग क्रमांक १८ मध्ये मजगे नगर येथे मजगे यांच्या शेतात तसेच पिनाटे यांच्या शेतात नाला असून या दोन्ही नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे.कन्हेरी गाव परिसरात खंदाडे नगर येथे एका बाजूने असणारा नालाही स्वच्छ करण्यात आला आहे.

    पावसाळा तोंडावर आलेला असल्याने मनपाकडून स्वच्छतेची कामे गतीने केली जात आहेत. दिनांक ५ जून पर्यंत मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!