सातारा (संभाजी पुरीगोसावी ) वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या खाजगी सावकारांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून. वडूज पोलिसांनी एका खाजगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिकंदर मंजिद मुलाणी असे या आरोपीचे नाव आहे. वडूज पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन सदर खाजगी सावकार हा गोरगरिबांना व्याजाने पैसे देवुन त्या रकमेची दाम दुप्पट रक्कम मिळवण्यासाठी फिर्यादीस तगदा लावला होता. अशी फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल होते. तसेच खाजगी सावकारांने फिर्यादीकडे ट्रकची कागदपत्रे व पाच कोरे चेक पैशांच्या मोबदल्यात फिर्यादीकडूंन १.१२५००/ रुपये व्याज व १.०० ०००/रुपये मुद्देमाल देवुन सुद्धा फिर्यादीस पैशासाठी तगादा लावला होता. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात सावकारा विरोधांत गुन्हा दाखल होता सदर आरोपीस गुन्ह्याच्या तपास कामी अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. देवकुळे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेखर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक अजय कोकाटे यांनी केली. तसेच या कारवाईत वडूज पोलिसांनी हद्दीमधील नागरिकांना आवाहन केले आहे. असुन अशा प्रकारे कोणी इसाम बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असेल तर त्यांनी वडूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.