मोबाईल मोटरसायकलसह २९०००/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
सातारा (संभाजी पुरीगोसावी ) . सातारा शहरांमध्ये सध्या गुन्हेगारीने चांगलेच डोकेवर काढले असून सातारा जिल्हा पोलीस दल देखील सतर्क दाखवत वरिष्ठांच्या आदेशावरुन आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळल्या आहेत. शाहुपुरी पोलिसांच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर शस्त्र बागणाऱ्या आरोपीच्या शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विक्रम अशोक साळुंखे (वय २४) रा. नेले ता. जि. सातारा) असे आरोपी़चे नाव आहे. सदर आरोपीच्या कब्जांतून बेकायदेशीर बाळगणाऱ्या शस्त्र १ कोयता २ सुरे मोबाईल व मोटरसायकलसह असा एकूण २९०००/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपींच्या विरोधांत शाहूपुरी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. किरणकुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. उपनि. कृष्णा गुरव पो हवा. मनोज मदने,निलेश काटकर महेश बनकर,अभय साबळे,ज्योतीराम पवार,सचिन पवार स्वप्निल सावंत,स्वप्निल पवार,सुनील भोसले,सुमित मोरे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.