
लातूर (प्रतिनिधी) लातूर शहरातील प्रभाग क्र.2 नाथ नगर पवन कॉलनी येथील हनुमान मंदिर सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री सुधाकर जी शृंगारे साहेब आणि लातूर शहर जिल्हा भाजपा चे जिल्हाध्यक्ष श्री. देविदास जी काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे बोलत होते. पुढे बोलताना, लातूर शहरातील प्रत्येक प्रभागातील विकासासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी सदैव कटिबध्द आपण केलेल्या आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी आश्वस्त केले. याप्रसंगी राजेंद्र परसबोने, माजी नगरसेवक रवी सुडे, रघुनाथजी बनसोडे, पुष्पाताई भडिकर, निर्मलाताई कांबळे, किसन बडगिरे सर, रत्नमालाताई घोडके, राजकुमार गोजमगुंडे, अरुण जाधव, शहर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मुन्ना हाश्मी, संजय सोनकांबळे, शैलेश भडीकर, जाकीर सय्यद, संजय कांबळे यांच्यासह नागरिक, मंदिराचे पदाधिकारी, महापालिकेचे कुणाल शिंदे, स्वच्छता निरीक्षक हिरामण कांबळे आदी सह स्थानिक कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
