
उदगीर (प्रतिनिधी) : प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचे वाटप केले.अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा तीन महिन्यांपूर्वी मोठया उत्साहात पार पडली. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा श्रीरामनवमी महोत्सव भक्तांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या नेतृत्वात हे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकार्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांच्या काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, तालुकाध्यक्षा उषा माने, शहराध्यक्षा शिल्पा इंगळे, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, आनंद बुंदे, अमोल अनकल्ले, माजी नगरसेविका कांताबाई कलबुर्गे, अरुणा चिमेगावे, मंदाकिनी जाधव, शिवगंगा बिरादार, वर्षा धावारे, कृपा सुर्यवंशी, कांताबाई सुर्यवंशी, मयूर पटणे यांच्यासह महायुतीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
