
किनगाव (प्रतिनिधी)अहमदपूर तालुक्यातील उजना ग्रा.पं. विकास कामामध्ये गैरव्यवहार करून अपहार केल्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या महिलेस सरपंचाच्या पतीने व गावातील गैर कायद्याची मंडळी जमा करून शनिवारी मध्यरात्री उपोषण करणाऱ्या महिलेच्या घरात घुसून ,महिलेवर पिस्तूल रोखून विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोस्टेला मंगळवारी रात्री उशिरा पाचजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
……..उजना येथील ४६ वर्षीय महिलेने सरपंच, ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत सेवक यांनी विकास कामांमध्ये गैरव्यवहार करून विकास निधीचा अपहार केल्याची चौकशी करण्याच्या मागणी करिता उजना ग्रा.पं . कार्यालया समोर दि१३ ऑगस्ट रोजी उपोषण केले. या प्रकरणी गट विकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांनी उपोषण सोडण्याबाबत लेखी दिलेल्या पत्राची सुनावणी मंगळवार दि. ३१ऑगस्ट रोजी ११ वाजता जि प लातूर येथे होणार होती . या चौकशीचा राग मनात धरून सरपंच महिलेच्या पतीने गैर कायद्याची मंडळी जमा करून उपोषण कर्त्या महिलेस घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन शनिवारी ( दि २८ ) रात्री११.४५ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून महिला सरपंच पती ज्ञानोबा कांडणगीरे यांनी स्वतः जवळील पिस्तुलचा धाक दाखवून, आरोपी विठ्ठल कासले यांनी महिलेचा हात धरून झोपेतून उठवून, तू लई माजलीस का ? तुझा माज उतरावं लागेल म्हणून वाईट हेतूने साडी ओढून विनयभंग केला. आरोपी माधव कासले व बालाजी कासले यांनी हात धरून तू गप्प बस नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली . आरोपी राहुल कासले यांनी डोक्याचे केस ओढून जीवे मारण्याची धमकी दिली. या पिढित महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोस्टेला मंगळवारी रात्री उशिरा सरपंच पती ज्ञानोबा बाबुराव कांडणगीरे , विठ्ठल नामदेव कासले ,माधव शंकर कासले, बालाजी किसन कासले व राहुल लक्ष्मण कासले यांच्या विरोध गुरन २३७ / २१ कलम४५२ , ३५४ , ३२३, १४३, १४४ , ५०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड हे करत आहेत. या प्रकरणाची चौकशी जि.प .लातूर यांनी काही कारणास्तव तारीख वाढवून दि. ७ सप्टेंबर रोजी दिल्याची माहितीपिडित महिलेने सांगितले आहे.
