
किनगाव (प्रतिनिधी) फिर्यादी डॉ.सुनील उत्तम दासरे यांच्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल दगडोबा नरवटे,वय 75 वर्षे रा. नरवटवाडी यांनी दवाखान्यात कोणतेही आयुर्वेदिक पदवी संपादन न करता, श्री संत ज्ञानराज आयुर्वेदिक दवाखना या नावाने कुठलीही नोंदणी न करता बोगस दवाखना चालवून त्यात विविध प्रकारचे औषधे तयार करून वापरून विक्री करून बोगस व्यवसाय करताना सापडला आहे.एकूण 153600 रुपयांची औषध जप्त केली आहे.त्यानुसार महाराष्ट्र वैधकिय आधिनियम 1961चे कलम 33 व 36. गु.रा.न.240/2021 कलम 420,418,468,471 भादवी किनगाव पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला.
