
96 लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन चांगला प्रतिसाद दिला
किनगाव (प्रतिनिधी)येथील पंचशील नगर येथील अंगणवाडी येथे दि 1/9/2021 वार बुधवार या दिवशी कोविड लसीकरण घेण्यात आले या लसीकरणाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन WHO च्या गीता जोशी य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद सांगवीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या लसीकरणाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे यांच्या हस्ते झाले यावेळी किनगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत प्रत्येक वार्डात कोरोणा काळात खुप चांगले काम व लसीकरणाचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्याबद्दल आरोग्य अधिकारी सांगवीकर साहेबांचा सत्कार धम्मानंद कांबळे यांनी केला व सर्व आरोग्य कर्मचारी व शिक्षकांचा पण सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉ सांगवीकर साहेब यांनी असे सांगितले कि प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत आतापर्यंत 14570 लाभार्थ्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे, तर येणाऱ्या काळात तीसरी लाट येण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी लस घ्यावी व सुरक्षित रहावे यावेळी ग्रामपंचायत सदस्या मदिनाबी शेख, भालेराव सिस्टर मुंडे सिस्टर,बि.टी घुले, मुंडे सिस्टर,शिक्षक मुंडे सर, कांबळे सर, वाघमारे सर,खरोडे सर, अंगणवाडी कार्यकर्ती माया कांबळे, कमलबाई गिते, मदतनीस सुनिता चाकाटे,मंगल कांबळे, लाभार्थी ललिता कांबळे, धनंजय सरकाळे, इसुब शेख,सुधीर चिकटे मगदुम पठाण,विक्रांत वाहुळे,हे उपस्थित होते.
