
शिरूर अनंतपाळ : (प्रतिनिधि) ग्रामपंचायतिच्या वतीने बिहार पॅटर्न व मियावाकी योजनेतून लागवड झालेल्या वृक्षाची पाहणी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री राहुल भैय्या केंद्रे, लातूर जिल्हा परिषेदेच्या उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री गोविंदराव चिलकुरे,जिल्हा खादीग्रामदयोग चेअरमन श्री दगडू साळुंखे यांनी पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
या प्रसंगी उपसरपंच सतीश सिंदाळकर, भा.ज.पा.तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, शाम शिंदाळकर,रुग्ण हक्क संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गंभीरे,निर्भीड पत्रकार ओमप्रकाश तांबोळकर,ग्रामविकास अधिकारी बि.जी.पठाण,अमर माडजे, तुकाराम पाटील व इतर नागरिक उपस्थित होते. स्मशानभूमीच्या सुशोभीकरणा साठीचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन या वेळी श्री राहुल भैय्या केंद्रे यांनी दिले.
