
किनगाव (प्रतिनिधी) सरकारी अधिकारी म्हटल की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेला असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम तुमची कार्य शैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात.
त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते.अशाच एका दबंग आणि जिगरबाज पोलिस अधिकारी यांचा निरोप समारोप कार्यक्रम झाला.
एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्व कर्मचारी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप समारंभ कार्यक्रम करतात. गेली 2 वर्षे अन्सापुरे साहेबांनी किनगाव पोलिस उपनरीक्षक म्हणून काम करताना किनगाव नगरीतील गुन्हेगारी अवैध धंदे यांना आळा घालण्याचे काम यांनी केले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किनगाव चे सरपंच किशोर मुंडे, त्रबंक गुटे, विठ्ठल बोडके, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड, पलमटे, कातले ,मुरकुटे, सिरसाठ, फिरोज शेख, आदी उपस्थित होते.

