
किनगाव (प्रतिनिधी) चाकुर तालुक्यातील रामवाडी येथील कृष्णा भागवत नागरगोजे वय 22 वर्षे धंदा शेती हा सकाळी 06.30 वाजता जनावरे चारण्यासाठी शेताकडे गेला होता,परंतु 09.00 वाजता जनावरे घराकडे आले पण कृष्णा आला नाही.गावातील लोकांनी शेताकडे जाऊन पाहणी केली असता,तो एका झाडाला गळफास घेतलेला दिसला.मिळालेल्या माहितीनुसार किनगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक म्रत्यु नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. पलमटे हे करत आहेत.
