
औसा :- { विलास } मनसे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यातली सर्व मंदिरं खुली करावीत या प्रमुख मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसाच्या वतीने आज दिनांक 4-9-2021 वार शनिवार रोजी औसा शहरातील प्रसिद्ध अशा श्री हनुमान मंदिरासमोर मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे शहराध्यक्ष मुकेश देशमाने यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले, राज्यातील सर्वच मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत अशा घोषणा देत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे व शहराध्यक्ष मुकेश देशमाने यांच्यासह महेश बनसोडे, जीवन जंगले, धनराज गिरी, इंजिनियर प्रशांत जोगदंड, राजेंद्र कांबळे, गोविंद चव्हाण,अमोल थोरात,सतीश जंगाले, तानाजी गरड,विकास लांडगे, विकास भोजने, वरुण देशपांडे, महादेव गुरुशेट्टे,ईश्वर परिहार,डॉ.समीर खान,दशरथ ठाकूर,गुणवंत लोहार,अतिक शेख,अभिषेक सूर्यवंशी,अभिजीत कठारे,नवनाथ कुंभार, विषाल मगर, अनिल बिराजदार,सोहेल शेख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
