
अहमदपुर 🙁 प्रतिनिधी )दि.3/9/21रोज शुक्रवार रोजी मौ. ढाळेगाव ता. अहमदपूर जि.लातूर येथील जी. प. प्रा. शाळा (झोपडपट्टी) येथे शाळा व्यवस्थापन समिती बैठक व पालक मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मुद्रिकताई शिवाजीराव भिकाने(जी.प. सदस्य लातूर) सरपंच सौ. मनीषा भिंगे ,जी. प. केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख श्री. कदम सर. मुख्याध्यापक श्री.ईरले एस.जी.सहशिक्षिका श्रीमती गुदळे के.आर.गावातील सुजाण नागरिक श्री. रामनाथ पलमटे व पालक आणि विद्यार्थी व अंगणवाडी मदतनीस श्रीमती आर्चना कांबळे या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला .केंद्रप्रमुख श्री कदम सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती व शाळेतील अडचणी या जी.प. सदस्या भिकाणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
