
लातूर :- ( प्रतिनिधी) शिरोमणी व श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नाभिक समाज बांधवांचा स्नेह मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माननीय ना. श्री संजय बनसोडे साहेब पाणीपुरवठा स्वच्छता व बांधकाम राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडला. दि.4/9/2021 रोजी पूर्णानंद मंगल कार्यालय येथे येथे लातूर जिल्हा नाभिक समाज यांच्या वतीने आयोजित संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नाभिक समाज बांधवाचा स्नेहमेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री संजय बनसोडे साहेब पाणीपुरवठा स्वच्छता व बांधकाम राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब शेंद्रे अध्यक्ष नाभिक महामंडळ हे कार्यक्रमाला उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून विक्रांत गोजमगुंडे महापौर मनपा लातूर तसेच श्री अभय दादा साळुंके प्रदेश सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,संतोष सूर्यवंशी मराठवाडा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अजित निंबाळकर मराठवाडा अध्यक्ष ओबीसी ब्रिगेड,अशोक गोविंदपूरकर नगर सेवक मनपा लातूर, एकनाथ पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेसओबीसी सले,रंगनाथ घोडके जिल्हा अध्यक्ष परीट धोबी समाज, सुदर्शन बोराडे प्रदेश उपाध्यक्ष युवा राष्ट्रीय ओबीसी महासंघ, दिलीप कुमार पिनाटे शहर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ धनंजय घाटकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितत कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते तसेच राज्यमंत्री माननीय श्री संजय बनसोडे साहेब पाणीपुरवठा स्वच्छता व बांधकाम राज्यमंत्री यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा पार पडला.लातूर जिल्हा हा ओबीसी बहुल जिल्हा असल्याने व त्यामध्ये नाभिक समाज मोठया संख्येने असल्यामुळे येणाऱ्या काळात महानगर पालिका मध्ये नाभिक समाजाचे 2-3 नगर सेवक प्रतिनिधित्व म्हणून राहतील असे प्रतिपादन महापौर यांनी केले. येणाऱ्या काळामध्ये राज्यात सुध्दा नाभिक प्रतिनिधीत्व राहील असे प्रतिपादन राज्य मंत्री यांनी केले, नाभिक समाजबांधवने या पुढे समाज मंदिरापेक्षा शिक्षणासाठी शाळा व वसतिगृह चे प्रस्ताव मांडा असे आव्हान राज्य मंत्रि महोदयांनी केले, या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे व समाज बांधव मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
