Spread the love


किनगाव (श्रीकांत मुंडे ) पोलीस ठाण्यात या महिन्यात पार पडत असलेल्या पोळा, गणेशोत्सव ,गौरी गणपती सणा निमित्ताने शांतता कमिटीची व गणेश मंडळ,गणेश भक्तांची बैठक शनिवारी घेण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना सुचित केले की , गणेश विसर्जन हे सार्वजनिक ग्रामपंचायत तर्फे करण्यात यावे , सर्व मंडळा तर्फे जर विसर्जन करत असतील तर ते पारंपारिक पद्धतीने कमीत कमी पाच ते सहा लोकांमध्ये विसर्जन साजरे करावे सर्व मंडळांनी आपल्या जबाबदारीने कोविड 19 च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल, एक गाव एक गणपती ही संकल्पना अमलात आणली तर शांतता राहील.यावेळी किनगाव पोलीस स्टेशन चे सपोनि शैलेश बंकवाड,उपनिरीक्षक राजेश जाधव,ग्रामविकास अधिकारी आर जी कांबळे,तलाठी हंसराज जाधव,पोलीस व्यंकट महाके,मुरलीधर मुरकुटे,महेबुब सय्यद,पोलीस पाटील मुजफ्फर देशमुख,विष्णू मुंडे, पञकार संघाचे सचिव बाळासाहेब गायकवाड, त्रिशरण वाघमारे, शाम सावंत, जाकेर कुरेशी,गोरख भुसाळे, असलम शेख तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते,गणेश भक्त,गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!