Spread the love


 लातूर :-(प्रतिनिधी)दिनांक 05/09/2021 रोजी डीसीपीसी हॉल, लातूर येथे  जिल्हा प्रशासनाचे वतीने गणेश उत्सव-2021 अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळाची शांतता बैठक पार पडली
गणेश उत्सव- 2021 अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळाची शांतता बैठक साय 0430 वा आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक मा. जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी. यांचे अध्यक्षतेखाली व पोलिस अधिक्षक श्री. निखील पिंगळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.सदर शांतता बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 29 जून 2021 च्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना वाचून दाखवल्या.अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी आपल्या संबोधन मध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळ स्थापन करण्याची परवानगी नसल्याने आप-आपल्या घरामध्ये, गाळ्यामध्ये, मंदिरामध्ये, खाजगी पक्क्या इमारतीच्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करावी. गणेश उत्सव साजरा करताना डॉल्बी /डीजे चा वापर करू नये असे सुचवले. कायदेभंग केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या. लातूर जिल्ह्यात जवळपास 92 हजार कोरोना केसेस नोंद झाल्या असून त्यापैकी 2450 रुग्ण कोरोना मध्ये मृत झाले. त्यामुळे कोरोना लसीकरण सारखे आरोग्य विषयक कार्यक्रम राबवून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे अशा सूचना दिल्या. बॅनर पोस्टर साठी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घ्यावी.श्री. अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांनी (एक गाव एक गणपती )याला प्राधान्य द्यावे तसेच कोरोना लसीकरण याच्या बाबतीत ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल व विशेष टीम नेमून लसीकरण पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र आणि भारतामध्ये कोरोना चा प्रादुर्भावला केंद्रबिंदू समजून त्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. गणेश उत्सव साजरा करताना डीजे/ डॉल्बीचा वापर तर करूच नये. परंतु लाऊड स्पीकर चा सुद्धा वापर करू नये असे आवाहन केले. कारण मा. सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णयानुसार 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे कोणतेही उपकरण लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. जबरदस्ती वर्गणी जमा करीत असल्याने काल दिनांक 04/09/2021 रोजी पोलीस ठाणे अहमदपूर येथे खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे गणेश मंडळाने स्वच्छेने दिलेली वर्गणी घ्यावी.लातूर जिल्हा हा सुसंस्कृत व सुशिक्षित कायद्याचे व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणारा जिल्हा आहे. अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे.त्यामुळे सैन्यातील एक सैनिक कुठलेही कारण न सांगता फक्त आदेशाचे पालन करतो. तशीच लातूर जिल्ह्यातील जनता ही प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करते आणि करत राहणार याची मला अनुभव व खात्री आहे. तसेच एवढ्या कमी कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील शांतता बैठकीसाठी एवढ्या मोठ्या संख्येने स्वयं स्फूर्तीने लोक उपस्थित झाले त्याबद्दल लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळाचे मी विशेष अभिनंदन करतो , मा. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये सांगितले की, माझा लातूर जिल्ह्यातील हा पहिलाच गणेश उत्सव असून समोर बसलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेच्या प्रतिसादास बघून आपण सर्व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार याची मला खात्री आहे. सध्याच्या कालावधीमध्ये दररोज जवळपास भारतामध्ये 40,000 कोरोना केसेस नोंद होत असून त्यापैकी 30,000 एकट्या केरळ राज्यात असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. गणेश मंडळाने मागणी केल्यास लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पुरेपूर मदत केली जाईल. आरतीच्या वेळी गर्दी होणार नाही याची गणेश मंडळाने दक्षता घ्यावी व *गणेश उत्सव गतवर्षीप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा करावा.पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सूत्रसंचालन* करताना लातूर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक 4 मध्ये गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. आसिफ बागवान हे असल्याचे उल्लेख करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले.
     एकंदरीत शांतता बैठकीत खालील मुद्द्याच्या ऊहापोह  करण्यात आला त्यामध्ये मुख्यता 
  • कोरोना मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.
  • गणेश मूर्तीची उंची सार्वजनिक चार फूट व घरगुती दोन फूट असावी.
  • पारंपारिक गणेश मूर्ती धातू किंवा संगमरवरी मूर्तीची स्थापना करावी.
  • वर्गणी देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा.
  • आरती, भजन, आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करण्यात यावेत.
  • महाप्रसादाचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • श्री गणेश मूर्तीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने देता येईल याची व्यवस्था करावी.
  • गणेश स्थापनेच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग ,शारीरिकअंतर मास्क, सॅनिटायझर इत्यादीची व्यवस्था करावी.
  • श्री चे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास पूर्णपणे बंदी आहे.
    -तसेच आपापल्या भागातील सर्व छोट्या-मोठ्या गणेश विसर्जन एकाच वेळी करण्याची व्यवस्था करण्यात यावी व विसर्जनाच्या ठिकाणी पर्यावरणास अनुरूप नियमांचे पालन करून गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात यावे. असे आवाहन करण्यात आले आहेत.
    शांतता बैठकीमध्ये भारत रत्नदीप आजाद गणेश मंडळ, लातूर चे श्री लक्ष्मीकांत बाहेती व औसा हनुमान गणेश मंडळाचे श्री. शिवा चौरे यांचा सत्कार करण्यात आला. शांतता बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळाचे 225 ते 250 पदाधिकारी हजर होते.
    लातूर जिल्हा सार्वजनिक गणेश उत्सव- 2021 शांतता बैठकीत जिल्हा प्रशासनातील श्री ढगे निवासी उपजिल्हाधिकारी श्री.गणेश बारगजे, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी , श्री.सुनील यादव उपविभागीय अधिकारी, श्री. स्वप्नील पवार तहसीलदार, श्रीमती शिंदिकर उप आयुक्त मनपा, श्री. बरुरे जिल्हा आरोग्य अधिकारी, श्री. समसे कार्यकारी अभियंता महावितरण, श्री. चौधरी जिल्हा कारागृह लातूर, श्री. थोरात सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर तसेच लातूर शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि, पुजारी, शिवाजीनगर, पोनि तिडके,विवेकानंद, पोनि माकोडे, गांधी चौक, पोनि मिरकले, MIDC,पोनि कदम, लातूर ग्रामीण हे असे बैठकीस हजर होते.वरील सर्व उपस्थितांचा लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
    शांतता बैठकीचा समारोप करताना श्रीमती प्रिया पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर ग्रामीण यांनी आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सव बंदोबस्तासाठी लातूर जिल्हा पोलिस दल सज्ज असून जिल्ह्यातील जनतेने पोलीस व प्रशासनातील लोकांना सहकार्य करावे असे आवाहन केले व उपस्थितांचे आभार मानून शांतता बैठकीचा समारोप केला.

गणपती बाप्पा मोरया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!