Spread the love


अहमदपूर : ( भीमराव कांबळे) दि. 9/9/21रोजी मौ. चिखली ता. अहमदपूर जी. लातूर येथील शिवारातील दोन पाझर तलाव अतिवृष्टी मुळे फुटल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेल्याने पिकाचे झालेले नुकसान व फुटलेल्या पाझर तलाव यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
मा. जिल्हाधिकारी यांच्या सोबत मंडळ अधिकारी ताटी पामुलवार मॅडम, तलाठी गडेकर , ग्रामसेवक कांबळे , चिखली गावचे सरपंच बालाजी गोविंदराव चाटे , पोलिस पाटील संग्राम बराडे , तसेच गावातील नागरिक पाझर तलावाची पाहणी करताना हजर होते.
गावातील शेतकऱ्यांनी शेतीतील पिकाचे नुकसान झाल्या संदर्भात लेखी तक्रार करून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे लेखी निवेदन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कडे सुपूर्त केले.
मंडळ अधिकारी व तलाठी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बराच वेळ चर्चा करून शेतकर्‍यांना समाधान कारक उत्तरे देत दिलासा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!