Spread the love

.

लातुर : (प्रतिनिधी ) दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनी सा. लोकाधिकार वार्ताच्या शुभारंभ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील स्वातंत्र्यसैनिक, सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर गुरुजी हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सुरेशराव पाटील नेत्रगावकर, राज्य शिक्षक नेते शिवाजीराव साखरे (वाघ), लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, लायन्स क्लब लातूर चे प्रकल्पप्रमुख ला. डॉ. श्यामसुंदर सोनी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बी.जी. कदम ॲड. विनायकराव शिंदे, स्वयं शिक्षण प्रयोग चे संचालक लक्ष्मीकांत माळवदकर, दत्तात्रय महाराज फुलारी, कैलास महाराज येडशीकर, शिवयोगी अनंत महाराज या मान्यवरांसह लोकाधिकारप्रमुख तथा लोकाधिकार वार्ताचे संपादक व्यंकटराव पनाळे हे उपस्थित होते.
प्रकाशन समारंभ प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकाधिकार च्या वतीने लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हाप्रमुख विरनाथ अंबुलगे, प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, प्रदेश सरचिटणीस हनुमंतराव शेळके, प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. राम गजधने, लातूर जिल्हा उपप्रमुख माधवराव तोंडारे, सुरेंद्रभाई अकनगिरे, महादेव जगदाळे, संभाजी गोरे, सूर्यकांत लोखंडे, ज्ञानेश्वर कोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी एकाच वेळी लोकाधिकार वार्ता या शुभारंभ अंकाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संपादक व्यंकटराव पनाळे यांनी आपले विचार मांडत असताना लोकाधिकार वार्ता सुरुवात करण्यामागचा उद्देश सांगून पूर्वीपासूनच चालू असलेल्या लोकाधिकार न्युज या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता कशाप्रकारे लोकाधिकार न्यूज काम करत आहे याची माहिती दिली. तसेच १२ जानेवारी २०२० रोजी स्वामी विवेकानंद जयंती दिनी स्थापन केलेल्या लोकाधिकार संघ या महाराष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून कोरोणाच्या कालावधीमध्ये केलेल्या रुग्णसेवा या कार्याची माहिती दिली. तसेच बोळेगावकर परिवाराने केलेल्या मदतीची ही माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की यापुढे दरवर्षी लोकाधिकार वार्ता चा वर्धापन दिन हा समाजातील आदर्श शिक्षक, समाजसेवक , पत्रकार आधी घटकांसह लोकाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असल्याने वर्धापन दिन हा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
तर स्वयं शिक्षण प्रयोग चे संचालक लक्ष्मीकांत माळवदकर यांनी लोकाधिकार च्या माध्यमातून राबवलेल्या कार्याची स्तुती करत लोकाधिकार चे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे व वंचित आणि शोषितांना न्याय मिळवून द्यावा असंही सांगितलं. तसेच लोकांच्या अधिकाराला अधिकारवाणीने उपाययोजनेत बदलणारा हा उपक्रम सिद्ध होवो असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बि.जी. कदम यांनी आपल्या भाषणामध्ये व्यंकटराव पनाळे यांच्या कार्याचे कौतुक करत ते घेत असलेली भरारी फिनिक्स पक्षासारखी आहे असे म्हणाले.
डॉ. श्यामसुंदर सोनी यांनी व्यंकटराव पनाळे हे चांगले व्यक्ती तर आहेतच पण ते खूप चांगले मित्र आहेत तसेच लायन्स क्लबच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या माऊली डायबिटीस सेंटरच्या उभारणीमध्ये दोन लाख रुपयांची दानरुपी आर्थिक मदत देऊन त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे असेही ते म्हणाले.
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे बोलत असताना म्हणाले की व्यंकटराव पनाळे हे लोकाधिकार न्यूज च्या माध्यमातून सक्रिय आहेतच परंतु लोकाधिकार वार्ता सुरू करून त्यांनी योग्य पाऊल उचलले आहे. तसेच ज्या ज्या वेळेला त्यांना काही मदत लागेल मी त्यांच्यासोबत आहे अशीही ग्वाही त्यांनी दिली.
राज्य शिक्षक नेते शिवाजीराव साखरे यांनी व्यंकटराव पनाळे हे लढाऊ व्यक्तिमत्त्व असून ते माझे चांगले मित्र तर आहेतच पण त्यांनी वेळोवेळी केलेली आंदोलने तसेच मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या माध्यमातून केलेले कार्यही सांगितले. तसेच भविष्यात व्यंकटराव पनाळे यांना विधान परिषदेवर संधी भेटावी अशी मनोकामना ही शिवाजीराव साखरे यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार सुरेशराव पाटील नेत्रगावकर बोलत असताना म्हणाले की व्यंकटराव पनाळे आणि माझ्यावर आयुष्यात खूप संकटे आली तरी आम्ही कधीच आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. तसेच आजच्या कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुण्यांना व्यंकटराव पनाळे यांनी संविधान हा ग्रंथ भेट देत खूप महत्त्वाचे कार्य केले आहे. लोकाधिकार वार्ताच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्यसैनिक व सेवानिवृत्त शिक्षक जीवनधर शहरकर गुरुजी यांनी व्यंकटराव पनाळे यांचे आजपर्यंत केलेल्या कार्याचे कौतुक करत भविष्यात ही त्यांच्या हातून समाजाभिमुख कार्य व्हावीत अशी मनोकामना व्यक्त करत लोकाधिकार वार्ताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आभार प्रदर्शन करत असताना लोकाधिकार वार्ताचे सहसंपादक संतोष पनाळे यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत, उपस्थित सर्व मान्यवरांचे ही आभार मानले. तसेच प्रिंटर्स, लेखक व जाहिरातदार यांचे आभार मानत ते असेही म्हणाले की ज्या लोकांना वाटतं होत आता यांचे कसं होईल, यांना आमच्या शिवाय पर्याय नाही. त्यांच्याकरिता ते म्हणाले की ‘ सूर्य मावळताना जरी दिसत असला तरी सूर्य कधी मावळत नसतो ‘. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन लिंबराज कुंभार, सूर्यकांत लोखंडे यांनी केले.
कार्यक्रमास प्रतापराव माने सर, राजेंद्र वनारसे, कुलदीपसिंह ठाकुर, ॲड. प्रेम रेड्डी, महेश माने, प्रसाद मठपती, अनिल हुलगुंडे, ओमकार शिंदे, गोविंद हुलगुंडे, विभागिय माहिती कार्यालयातील अशोकराव माळगे, ॲड. बालाजी कुटवाडे, विश्वजीत भारती, ॲड. अतिष अलगुले, ॲड. माधव गुडे, गौसभाई पिरजादे, जनार्दन पाटील, दत्तात्रय गुनाले, लक्ष्मीकांत मुळे, प्रा. शिवाजी भारत माने, सतीश सुळे महाराज, वैजनाथ मुळे, गोविंद चिगळे, संजय वाघमारे, विजयकुमार पिनाटे, सुदर्शन बोराडे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, प्रा. सोमनाथ स्वामी डिगोळकर, बाळु बुध्दे, श्रीकांत चलवाड, रवी बिजलवाड, संतोष सोनवणे, अहिल्या कसपटे, हरी गोटेकर प्रकाश कंकाळ, अच्युत गायकवाड, प्रदीप बंडे सोलापूर, महादेव जगदाळे, सादिक शेख, रमण रत्नपारखे, नगिनी मुकेश गवळी, कोमल गोपीचंद माळी, रणजीत आचार्य, सिध्देशवर जाधव, नागेश आरसुळ, विकास महाराज गायके, परमेश्वर महाराज कदम, काशीनाथ लुंगारे, विष्णुदास पाटे, रामचंद्र बरुरे, हाजी बाबा शेख, हरिश्चंद्र बरुरे, नारायण मांडवे, रशीद शेख, संजय बरुरे, मधुकर बस्तापुरे, ओम आकनगिरे, मकरंद कुलकर्णी, राम पंडगे, फुलचंद माळी, अमर बिराजदार, विकी बेरकिले, शिवम देवशेटवार, शिवसांब नागलगावे, अभी वाघमारे, योगेश दीक्षित गौसभाई शेख, शिवदास बुलबुले, प्रशांत बोळेगावकर, संतोष स्वामी, संतोष गुंडरे, डॉ. सरवदे जी. आर. डॉ. कोळेकर एच. डी., डॉ. रेड्डी एस. जी. दीपक गवळी, गोरखनाथ गायकवाड, अभिषेक मंत्री, प्रभाकरराव हेंडगे, विष्णू बरुरे, एस. एन. येलुरकर, गुरुप्रसाद हेंडगे, गणेश सगर, सचिन इगे, बालाजी कैले, संभाजी जटाळ, सुशील पनाळे, राजेंद्र कैले, तानाजी मुळे, कृष्णा पनाळे, कुलदीप हेलाले, आकाश पनाळे, अमोल पनाळे, श्याम गुरमे, सशील तिगीले, अर्जुन बरुरे, मनोज जटाळ, बाळू येरमे, अजित बजाज, गणेश चामे, अतिश कुटवाड, विराट धावारे, रफिक शेख, अलीम सय्यद, दाजीबा सरवदे, सुनील कांबळे, वाल्मीक कांबळे, अंकित बजाज, परमेश्वर पोटभरे, बालाजी पनाळे, भागवत तिगीले, पृथ्वीराज कुरे पाटील, कृष्णा साबदे, अरविंद कासले, आकाश पाटील, राम पाटील, इजराइल शेख, विवेक अंबुलगे, तानाजी खिचडे, सूनील चरकपल्ले, विनय अंबुलगे, अमित बजाज, ॲड. किरण पाटील, चंदाताई मंत्री, संयोगिता स्वामी, जयश्रीताई सगर, सरोजा हेंडगे, सुरेखा बस्तापुरे, निर्मला पनाळे, छाया पनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!