Spread the love
लातूर:- {प्रतिनिधी} दिनांक 08/092021 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे आगामी सण उत्सव चे अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्री.निसार तांबोली हे लातूर जिल्ह्याचे दौऱ्यावर आले होते.
       तेव्हा आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये सपोनि श्री. राहुल बहुरे हे पोलीस ठाणे औसा येथे येथे कार्यरत असताना पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उत्कृष्टरित्या तपास करून चोरीस गेलेले मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात आले होते.
     सदर गुन्ह्याची उकल करीत असताना त्यांनी अतिशय बारकाईने भौतिक व तांत्रीक माहितीचा उत्कृष्टपणे वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल पूर्णपणे हस्तगत केला होता. 
    सपोनि श्री.राहुल बहुरे यांचे उत्कृष्ट तपास कार्यपद्धतीची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय कडून त्यांना युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर करण्यात आले होते.
       त्यानिमित्ताने श्री.सपोनि राहुल बहुरे व त्यांना तपासकामी मदत करणारे पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, राजेश कंचे, विश्वंभर तुरे यांना पोलीस उपमहानिरीक्षक श्री.निसार तांबोली यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी व  पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!